Government Job: परीक्षा न देताच सरकारी नोकरी; पगार १ लाख ४० हजार; कुठे,कसा अर्ज कराल? वाचा

ESIC Recruitment 2024: सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती सुरु आहे. तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
Government Job
Government JobSaam Tv

सरकारी नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती सुरु आहे. कोणतीही लेखी परीक्षा न देता तुम्हाला नोकरी मिळवता येणार आहे. त्यामुळे तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. तुम्ही या नोकरीसाठी लगेच अर्ज करा.

Government Job
Government Job: तरुणांनो तयारीला लागा! महाराष्ट्र वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी; ५० हजारांपर्यंत मिळणार पगार, जाणून घ्या...

कर्मचारी राज्य विमा महामंडळात ५७ पदांवर उमेदवारांसाठी रिक्त जागा आहे. या रिक्त जागांसाठी भरती राबवण्यात आली आहे. ही नोकरी सिनियर रेजिडेंटसाठी आहे. ही पदे रेसिडेन्सी स्कीमसाठी उपलब्ध आहे. क्लिनिकल आणि नॉन- क्लिनिकल या पदांसाठी तुम्ही अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने डॉक्टर ऑफ मेडिसिन (एमडी), डॉक्टर ऑफ सर्जरी (एमएस) किंवा मेडिकल पीजी डिप्लोमा ही पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. या पदांसाठी निवड वॉक-इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाईल. १ आणि २ जुलै रोजी ESIC मुख्य कार्यालयात ही मुलाखत घेण्यात येईल.यासाठी तुम्हाला पीजीआयएमएसआर,ईएसआईसी मेडिकल कॉलेज, जोका येथे जावे लागेल.

Government Job
BMC Job : चौथी पास तरुणांनाही मुंबई महापालिकेत मिळणार नोकरी; सर्व माहिती एका क्लिकवर

या नोकरीसाठी वयोमर्यादा ४५ वर्ष आहे. मुलाखतीसाठी तुम्हाला सकाळी ९.३० ते १०.३० या कालावधीत पोहचावे लागेल. याबाबत अधिक माहिती esic.gov.in वर दिलेली आहे. या नोकरीसाठी १,४०,१३९ रुपये प्रति महिना वेतन मिळेल.

Government Job
SSC MTS Recruitment: दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी; कर्मचारी निवड आयोगात ८३२६ रिक्त जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com