SSC MTS Recruitment: दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी; कर्मचारी निवड आयोगात ८३२६ रिक्त जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर

SSC Recruitment 2024: कर्मचारी निवड आयोगाने भरती जाहीर केली आहे. जवळपास ८,३२६ रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर आजच अर्ज करा.
SSC Recruitment
SSC RecruitmentSaam Tv

कर्मचारी निवड आयोग (SSC)ने भरती जाहीर केली आहे. मल्टी टास्किंग (नॉन टेक्निकल)स्टाफ आणि हवालदार (CBIC आणि CBN) परीक्षा साठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. या परीक्षेसाठी तुम्ही अर्ज दाखल करु शकतात. यासाठी तुम्हाला कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. ssc.gov.in या वेबसाइटवर याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे.

SSC Recruitment
BMC Job : चौथी पास तरुणांनाही मुंबई महापालिकेत मिळणार नोकरी; सर्व माहिती एका क्लिकवर

SSC ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, MTS आणि हवालदार पदांसाठी एकूण ८,३२६ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यापैकी ४८८७ रिक्त जागा मल्टी टास्किंग स्टाफसाठी आहे तर ३४३९ जागा CBIC आणि CBN मध्ये हवालदा पदांसाठी आहे.

या नोकरीसाठी अर्ज करण्याती शेवटची तारीख ३१ जुलै आहे. या अर्जासाठी १०० रुपये शुल्क घेण्यात येणार आहे. हे शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२४ आहे. याशिवाय अर्जामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर ते तुम्ही १७ ऑगस्ट २०२४ पर्यंत करु शकतात.

SSC Recruitment
Mahatransco Recruitment: खुशखबर! Mahatransco मध्ये ४०७७ जागांसाठी भरती; अशा प्रकारे करा अर्ज

CBN मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदारासाठी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्ष असावे, तर सीआयबीसीमध्ये हवालदार आणि एमटीएसच्या पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्ष आहे. उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली असावी. याबाबत सर्व माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.

SSC MTS टियर १ परीक्षा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

SSC Recruitment
Post Office Recruitment 2024: दहावी पास उमेदवारांना पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी; अर्ज कुठे अन् कसा करायचा? जाणून घ्या...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com