देशातील अग्रणी कार निर्माती कंपनी मारूती सुझुकी विविध प्रकारातील कार निर्माण करते. प्रत्येक वर्षी मारूती कंपनीच्या वाहनांची विक्री विक्रमी होत असते. ऑक्टोबर महिन्यात या कंपनीच्या मारूती सुझुकी वॉगनर या कारच्या एकूण २२०८० युनिट विकल्या गेल्या. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात या कारच्या १७९४५ इतक्या युनिट विकल्या गेल्या होत्या. या आकड्यावरुन या कार निर्मिती कंपनीची क्रेझ अजून काय असल्याचं दिसत आहे. मारूती सुझुकीच्या वाहनांची विक्री इतकी का होते हे आपण मॉडेलनुसार जाणून घेऊ. (Latest News)
Swift कारच्या २०५९८ युनिटची विक्री
वाहनांच्या विक्रीमध्ये वॉगनर कार पहिल्या स्थानी राहिली, तर ऑक्टोबर महिन्यातील विक्रीमध्ये स्विफ्ट कार दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती. या महिन्यात मारूती सुझुकी स्विफ्ट कारच्या २०५९८ च्या युनिट विकल्या गेल्या. यानंतर तिसऱ्या नंबरवर मारूती सुझुकीची बलेनो कार असून या कारचे एकूण १६५९४ युनिट विकल्या गेल्या. या यादीत चौथ्या नंबरवर मारूती सुझुकी ब्रेझाचे एकूण १६०५० युनिट विकले गेले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तर पाचव्या क्रमांकावर मारूती सुझुकी डीझायर कार असून या कारचे १४६९९ युनिट विकले गेले होते. दरम्यान मारूती सुझुकीने १ जानेवारी २०२४ मध्ये आपल्या कारच्या किमतीमध्ये वाढवण्यात येतील, असं सांगितलंय. तसेच नवीन वर्षात मारूती कंपनी स्विप्ट कारची नवीन मॉडेल बाजारात आणणार आहे.
Maruti Wagon R
ही कार पेट्रोल आणि सीएजी अशा दोन प्रकारात उपलब्ध आहे. या कारमध्ये ९९८ सीसी आणि ११९७ सीसी इंजिन दिलं जात आहे. ही पाच सीटर कार आहे, ज्यात मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही ट्रांसमिशन आहेत. या कारमधील सर्वात टॉप मॉडेलची किमत ७.४२ लाख रुपये आहे. या कारमध्ये ११ व्हेरियंट असून ९ रंग उपलब्ध आहेत.
या कारच्या वेगवेगळ्या व्हेरियंट २३.५६ पासून ते २५.१९ पर्यंत kmplचं मायलेज देतात. Wagon Rमध्ये ३४१ लीटर बूट स्पेस मिळते. या हॅचबॅक कार ५५.९२ ते ८८.५ bhp पर्यंतचं मॅक्सिमम पावर जनरेट करतात.
Maruti Swift Car
या कारच्या बेस मॉडलची किमत एक्स शोरूम ५.९९ लाख रुपये आहे. या हॅचबॅक कारमध्ये मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही ट्रांसमिशन दिल्या जातात. ही कार ३०.९ kmplचं मायलेज देते. या कारला ११९७ सीसीचं पेट्रोल व्हर्जन दिलं जातं. त्याचबरोबर ही कार सीएनजीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. या कारच्या टॉप मॉडेलची एक्स शोरुम किमत ९.०३ लाख रुपये आहे. ही कार LXi, VXi, ZXi,आणि ZXi+ या चार प्रकार उपलब्ध आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.