Maruti Suzuki Grand Vitara: मारूती सुझुकीची तगडी कार आली; पाहा मायलेज, फीचर्स, किंमत

भारतातील कारनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकीने आपली नवी तगडी कार लॉंच केली आहे.
Maruti Suzuki one of the leading car manufacturers in India has launched its new compact car
Maruti Suzuki one of the leading car manufacturers in India has launched its new compact carSaam Tv
Published On

नवी दिल्ली: भारतातील(India) कारनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकीने आपली नवी तगडी कार लॉंच केली आहे. मारुती सुझुकीच्या (Maruti Suzuki Grand Vitara) 2022 या कारवरील पडदा आता उठला आहे. हुंदाई क्रेटा, किया सेल्टॉस, स्कोडा कुशाक यांसारख्या कारना ती जबरदस्त टक्कर देईल, असं बोललं जात आहे.

भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीची नवी कार लाँच झाली आहे. कंपनीने 'मारुती सुझुकी ग्रॅंड व्हिटारा' कार बाजारात आणली आहे. हे फ्लॅगशिप मॅाडेल आहे. मारूती सुझुकी 'ग्रॅंड व्हिटारा' या न्यू स्पोर्ट्स कारमध्ये एसयूव्ही प्रगत आणि हायटेक फीचर्स आहेत. यामुळेच मारूतीची स्पोर्ट्स कार Hyundai Creta, Kia Seltos, Skoda Kushaq यांसारख्या कारना जबरा टक्कर देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.

Maruti Suzuki one of the leading car manufacturers in India has launched its new compact car
२१ विद्यार्थ्यांना घेवून जाणारी धावती बस भररस्त्यात पेटली, त्यानंतर...

नवीन मारुती सुझुकी ग्रँड व्हिटारा एसयूव्हीची विक्री नेक्सा आऊटलेट्समधून करण्यात येईल. त्यासाठी प्री-बुकिंग सुरू झाली आहे. तुम्ही ही कार ११ हजार रुपये टोकन रक्कम देऊन बुक करू शकता.

मारुती सुझुकीने अद्याप ग्रँड किंमत जाहीर केलेली नाही. मात्र, या कारची किंमत ९.५ लाख रुपये (एक्स शोरूम) पासून सुरू होईल, अशी जोरदार चर्चा आहे. या कारचे उत्पादन ऑगस्टमध्ये पूर्ण क्षमतेने सुरू होईल आणि किंमतीची घोषणा यावर्षी सप्टेंबरमध्ये होईल. नवीन कार मारुती सुझुकी ग्रँड व्हिटारा ६ मोनोटोन एक्स्टिरियर शेड्स आणि तीन ड्युएल टोन फिनिशसह उपलब्ध होईल. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार २७.९७ किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देईल. तो या कॅटगरीतील सर्वाधिक असेल. ही भारतातील सर्वाधिक फ्युएल-इफिशियन्ट एसयुव्ही देखील आहे.

Maruti Suzuki one of the leading car manufacturers in India has launched its new compact car
Presidential Election Result 2022 : 'अशी' होते राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी, वाचा सविस्तर

या कारमध्ये एक स्लीक आणि मस्कुलर डिझाइन आहे. मोठी फ्रंट ग्रिल आणि स्क्वायर व्हील आर्चमुळे नव्या कारचा लूक मॉडर्न दिसतो. २०२२ ग्रँड व्हिटारामध्ये चारही बाजूला एलईडी लायटिंग, प्लास्टिक बॉडि क्लॅडिंग आणि आणखी काही फीचर्स आहेत.

दोन इंजिनचे पर्याय या कारमध्ये उपलब्ध असतील. एक म्हणजे १.५ लिटर माइल्ड हायब्रिड सिस्टम आहे, जे ५ स्पीड मॅन्युअल किंवा एटीच्या मदतीने १०० बीएचपी आणि १३५ एनएम पीक टॉर्क जनरेट करतो. यात आणखी एक १.५ लिटर मजबूत हायब्रिड इंजिन आहे, ज्यात ई-सीव्हीटीसह जोडला गेलेला आहे. हे इंजिन ११४ बीएचपी पॉवर जनरेट करते.

फीचर्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर, नव्या मारुती सुझुकी ग्रँड व्हिटारामध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह ९ इंचाचे इन्फोटेन्मेंट सिस्टम आणि कनेक्टेड कार यंत्रणा आहे. त्यात स्मार्टवॉच, ड्युएल टोन इंटेरिअर, रियर एसी व्हेंट, पॅनोरमिक सनरूफ, हेड अप डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग, ऑटोमॅटिक एसी, हाइट एडजस्टेबल ड्रायव्हर सीट, रिक्साइनेबल रिअर सिट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह अनेक फीचर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com