Presidential Election Result 2022 : 'अशी' होते राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी, वाचा सविस्तर

राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी आज संसद भवन परिसरात सुरु आहे, वाचा सविस्तर
Rashtrapati Bhavan
Rashtrapati Bhavansaam tv

नवी दिल्ली : देशातील अत्यंत महत्वाची राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक १८ जुलै रोजी पार पडली. एनडीच्या (NDA) राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) विरुद्ध विरोधी पक्षांकडून संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) असा सामना राजकीय वर्तुळात रंगला आहे. दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी आज संसद भवन (sansad bhavan) परिसरात सुरु आहे. सर्व मतपेट्यांची मोजणी सुरु आहे. देशात सर्व ३१ केंद्रांवर मतदान प्रकिया पार पडली. त्यानंतर सर्व मतपेट्या मंगळवारी संसद भवनात दाखल केल्या. आज संध्याकाळ पर्यंत (Voting calculation) मतमोजणी पूर्ण होईल, असा आशावाद आहे. यावेळी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी ९९ टक्क्यांहून अधिक मतदान झाले.

Rashtrapati Bhavan
India vs West Indies 1st ODI Live : भारत-वेस्ट इंडिज पहिली वनडे उद्या, कधी आणि कुठे पाहाल?

सर्वात आधी संसद भवनात झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार

राष्ट्रपती निवडणुकीत (President Election) सर्वात आधी संसद भवनात झालेल्या मतदानाची मोजणी केली जाते. १८ जुलैला संसद भवनात ७३० मतं देण्यात आली. त्यावेळी एकूण आठ खासदारांनी मतदान केले नाही. त्यानंतर राज्यांतील विधानसभेत झालेल्या मतांची मोजणी करण्यात येईल. यासाठी इंग्लिश अल्फाबेटनुसार १० राज्यांच्या मतपेट्या एकापाठोपाठ काढण्यात येतील.

Rashtrapati Bhavan
...आम्ही १०० टक्के खुश नाही; ओबीसी आरक्षणाबाबत छगन भुजबळ पंतप्रधानांकडे करणार 'ही' मागणी

देशातील १५ व्या राष्ट्रपतिपदाच्या निवणडुकीसाठी सोमवारी १८ जुलैला मतदान प्रक्रिया पार पडली. त्यावेळी संसद भवनात ९९.१८ टक्के मतदानाची नोंद झाली. तर देशातील १० राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान झालं. तसेच काही राज्यांमध्ये क्रॉस वोटिंगही झाली. राष्ट्रपती निवडणुकीत सर्वात जास्त मत मिळालेला विजेता नसतो, तर एका निश्चित आकडेवारीपेक्षा अधिक मतं ज्याला मिळतात तो विजयी ठरवल जातो.

प्रत्येक उमेदवाराला दिलेल्या मतदानांची बेरीज करुन त्याला दोन ने विभागलं जातं. त्यानंतर एक जोडून कोटा निर्धारित केला जातो. यानुसार अधिक मताधिक्य मिळवणाऱ्या उमेदवाराचा विजय निश्चित केला जातो. उत्तर प्रदेशच्या एका आमदाराच्या मताचं मूल्य २०८ आहे. जे इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. त्यानंतर झारखंड आणि तामिळनाडूच्या आमदारांच्या मतांचे मूल्य १७६ आहे. तर महाराष्ट्रातील आमदारांच्या मतांचे मूल्य १७५ आहे. सर्वात कमी मूल्य सिक्किमच्या आमदारांचे (फक्त ७ )आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com