Mahatransco Recruitment: खुशखबर! Mahatransco मध्ये ४०७७ जागांसाठी भरती; अशा प्रकारे करा अर्ज

Mahatransco Recruitment 2024: जर तुमचे इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण झाले असेल तर तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध जागांसाठी भरती सुरु आहे.
Mahatransco Recruitment
Mahatransco RecruitmentSaam Tv

तुम्ही अभियांत्रिकेचे शिक्षण घेतले असेल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी म्हणजेच महाट्रान्सको अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी कंपनीने जाहिरात प्रकाशित केली आहे. जवळपास ४०७७ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

Mahatransco Recruitment
Government Job: परीक्षा न देताच सरकारी नोकरीची मोठी संधी; NMDC मध्ये शिकाऊ पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर

महाट्रान्सको अंतर्गत नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. वरिष्ठ तंत्रज्ञ(Senior Technician) , सहायक अंभियता (पारेषण), (Assistant Engineer), सहायक अंभियता (दूरसंचार)(Assistant Engineer Telecommunication), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Deputy Executive Engineer), कार्यकारी अभियंता, विद्युत सहायक (Electrical Assistant) या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

Mahatransco Recruitment
NHAI Recruitment: NHAI मध्ये विविध पदांसाठी भरती; मिळणार ६ लाख रुपये पगार;अशा पद्धतीने करा अर्ज

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येता आहे. या नोकरीसाठी अर्जदाराचे वय १८ ते ५७ असावे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://www.mahatransco.in/ या साइटला भेट द्यावी लागेल.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य क्षेणीतील प्रवर्गाला अभियंता पदासाठी ७०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर SC/ST/EWS उमेदवारांना ३५० रुपये फी भरावी लागणार आहे. तर तंत्रज्ञ पदासाठी सामान्य क्षेणीतील लोकांना ६०० रुपये तर SC/ST/EWS उमेदवारांना ३०० रुपये फी भरावी लागणार आहे.

Mahatransco Recruitment
Post Office Recruitment : दहावी पास उमेदवारांना पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी; अर्ज कुठे अन् कसा करायचा? जाणून घ्या...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com