Shreya Maskar
घर आणि नोकरी दोन्ही सांभाळण्यासाठी वेळेचं गणित समजून घेणे महत्वाचे आहे.
काम असंख्या असतात पण गरजेनुसार त्यांना प्राधान्य दिले पाहिजे. म्हणजे धांदल उडत नाही.
आजकाल बाजारात अनेक वस्तू उपलब्ध आहेत. ज्यामुळे तुमची काम सोपी होतात. या वस्तूंचा वापर करा. उदा. वॉशिंग मशीन
स्वतःसाठी वेळ काढल्यास इतर अनेक कामे करायला उत्साह येतो. त्यामुळे सर्वात आधी स्वतःसाठी वेळ काढा.
घर-करिअर दोन्ही सांभाळायचे असल्यास आपले आरोग्य चांगले असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पौष्टिक खा आणि योग्य व्यायाम करा.
आयुष्यात मिळालेल्या सुखांचे वेळ काढून सेलिब्रेशन करा. कारण यामुळे तुम्हाला पुढे काम करण्याचे प्रोत्साहन मिळते.
आपल्या कामाचे स्वरूप घरच्यांना आधीच सांगून ठेवा. तुम्हाला वेळ मिळेल तशी घरची काम करा.
सर्वात महत्वाचे ऑफिसची कामे घरी करणे टाळा आणि घरच्यांना वेळ द्या.
कामाचा ताण घरी येताना बाहेरच सोडून द्यावा. त्यामुळे घरातील वातावरण बिघडते.
घरात आणि कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाटून घ्या. म्हणजे काम पटापट होतील.
ही फक्त सामान्य माहिती आहे.