Akola News: मोठी बातमी! मुसळधार पावसामुळे पोलीस भरती प्रक्रिया स्थगित, मैदानी चाचणी पुढे ढकलली

Akola Police Recruitment Process Postponed: मुसळधार पावसामुळे पोलीस भरती प्रक्रिया अकोल्यात स्थगित करण्यात आलीय. मैदानी चाचणी पुढे ढकलली आहे.
पोलीस भरती प्रक्रिया स्थगित
Akola Police Recruitment ProcessSaam Tv

अक्षय गवळी, साम टीव्ही अकोला

अकोल्यातून पोलीस भरती संदर्भात मोठी बातमी समोर आलीय. मु्ंबईप्रमाणेच अकोल्यात देखील काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अकोला पोलीस भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत काहिसा बदल झालाय.

पोलीस भरती प्रक्रिया स्थगित

अकोला पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी आज ८ जुलै रोजी घेण्यात येणार होती. ती आता ११ जुलै रोजी होणार आहे. आज ८ जुलै रोजी तब्बल १ हजार १५४ महिला उमेदवारांची मैदानावरील शारीरीक चाचणी होणार (Akola Police Recruitment Process Postponed) होती, पावसामुळे ही मैदानी चाचणी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या मैदानी चाचणीसाठी तारीख ११ जुलै ठरली आहे.

पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया

दरम्यान अकोला पोलीस दलात १९५ पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया मागील १९ जून पासून सुरु झाली होती. पण काल रात्री आणि आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे पोलीस मुख्यालय येथील मैदान तसेच वसंत देसाई स्टेडीयम पाणी साचलं (Akola News) आहे. त्यामुळे या मैदानावर शारीरीक चाचणी घेता येणार नाही.

पोलीस भरती प्रक्रिया स्थगित
Heavy Rain In Bhiwandi: भिवंडीला मुसळधार पावसानं झोडपलं; रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं, नागरिकांची तारांबळ VIDEO

पोलीस भरतीसाठी नवे वेळापत्रक

आता पुन्हा होणाऱ्या पोलीस भरतीसाठी वेळापत्रक ठरलेले आहे. त्यानुसार भरती प्रक्रिया ११ जुलै रोजी होणार (Heavy Rain) आहे. त्यामुळे महिला उमेदवारांनी ११ जुलै रोजी हजर (Police Bharati 2024) राहावे, असं आवाहन अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांनी केलं आहे. विशेष म्हणजे पावसामुळे सर्व उमेदवारांची तात्पुरती थांबण्याची व्यवस्था अकोला पोलीस लॉन येथे करण्यात आली होती.

पोलीस भरती प्रक्रिया स्थगित
Maharashtra Rain Alert : छत्र्या घेऊनच घराबाहेर पडा, राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांना झोडपणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com