Heavy Rain In Bhiwandi: भिवंडीला मुसळधार पावसानं झोडपलं; रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं, नागरिकांची तारांबळ VIDEO

Maharashtra Monsoon Update Bhiwandi Rain: भिवंडीमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचलंय. नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
 भिवंडीमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस
Heavy Rain In BhiwandiSaam Tv
Published On

फैय्याज शेख, साम टीव्ही भिवंडी

भिवंडीमध्ये रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात दोन फुटांपर्यंत पाणी साचले असल्याचं समोर आलं आहे. रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालीय. भिवंडी शहरातील तीन बत्ती, भाजी मार्केट, बाजारपेठ, कल्याण नाका, पटेल नगर, कमला हॉटेल परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.

तीन बत्ती, भाजी मार्केट परिसरात दोन फुटांपर्यंत पाणी साचलं असून भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली (Heavy Rain In Bhiwandi) आहे. अनेकजण पाण्यामधून घरी जाण्यासाठी वाट काढत आहेत. तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे अनेक वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असून वाहतूक देखील मंदावली आहे.

रात्रीपासून मुसळधार पाऊस

भिवंडीमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे, जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर परिस्थिती अजूनही बिकट होण्याची दाट शक्यता आहे. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याचं दिसत (Bhiwandi News) आहे. रस्ते-नाले पाण्याने तुडूंब भरले आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

 भिवंडीमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस
Kalyan Rain : अवघ्या तासाभराच्या पावसानं कल्याण झालं जलमय, विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून काढावी लागली वाट

काळजी घेण्याचं आवाहन

सध्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक नदी-नाले उसंडून वाहण्यास सुरुवात झाली (Maharashtra Monsoon Update) आहे. भिवंडी शहरालगत असणाऱ्या कामवारी नदीमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास परिसरातील काही लहान अल्पवयीन मुले पोहण्यासाठी उतरले होते, त्यांनाही सक्त ताकीद दिल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. आता अनेक ठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत, त्यामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात (Monsoon Update) आहे.

 भिवंडीमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस
Rain Updates : मुंबईसह, पुण्यात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस; कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी १७ फुटांवर, VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com