Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्याला पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांमध्ये IMD कडून 'यलो अलर्ट' जारी, कसं असेल आजचे हवामान? वाचा...

Maharashtra Rain News Weather IMD Alert Update: विदर्भामध्ये आज मध्यम ते मुसळधार पाऊस पडले, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्टही देण्यात आला आहे. कसं असेल आजचे वेदर अपडेट? जाणून घ्या सविस्तर....
Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्याला पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांमध्ये IMD कडून 'यलो अलर्ट' जारी, कसं असेल आजचे हवामान? वाचा...
Maharashtra Weather Update Saam TV
Published On

Maharashtra Rain News: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. कालपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी आज राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भामध्ये आज मध्यम ते मुसळधार पाऊस पडले, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्टही देण्यात आला आहे. कसं असेल आजचे वेदर अपडेट? जाणून घ्या सविस्तर....

Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्याला पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांमध्ये IMD कडून 'यलो अलर्ट' जारी, कसं असेल आजचे हवामान? वाचा...
Rain in Maharashtra : मराठवाड्यात आभाळ फाटलं! अनेक जिल्ह्यांमध्ये धडकी भरवणारा पाऊस, पाहा VIDEO

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विदर्भ तसेच खानदेशात आज मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज विदर्भातील गडचिरोली, अकोला, अमरा, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे धुळे, जळगाव, नंदुरबार आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकटासह, वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या या अंदाजानुसार, मराठवाड्यामधील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्याला पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांमध्ये IMD कडून 'यलो अलर्ट' जारी, कसं असेल आजचे हवामान? वाचा...
Pune Crime: पुण्यात हत्या, हल्ले, लूट काही थांबेना; विद्येचं माहेरघर की अंडरवर्ल्डचा अड्डा?

कोकणातही पावसाचा जोर ओसरला असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच या भागामध्ये तीन दिवसांचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासह पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जळगाव जामनेर तालुक्यात जोरदार पावसामुळे शेतीमध्ये पाणी शेतातील कपाशी मोठे नुकसान झालेले आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पाऊस सुरू आहे या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या नुकसान झालेलं बघायला मिळत आहेत. जामनेर तालुक्यातील पिंपरी गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कपाशी लागवड केली होती, मात्र सततच्या पावसाने शेतात पाणी साचल्याने कपाशीचे मोठ नुकसान या ठिकाणी होताना बघायला मिळत आहे.

Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्याला पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांमध्ये IMD कडून 'यलो अलर्ट' जारी, कसं असेल आजचे हवामान? वाचा...
Pune Crime: भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला, पुण्यात नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com