Pune Crime: पुण्यात हत्या, हल्ले, लूट काही थांबेना; विद्येचं माहेरघर की अंडरवर्ल्डचा अड्डा?

Pune Crime: शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात आता गुन्हेगारीचं ग्रहण लागलं आहे.
Pune Crime: पुण्यात हत्या, हल्ले, लूट काही थांबेना; विद्येचं माहेरघर की अंडरवर्ल्डचा अड्डा?
file pic
Published On

एकही दिवस जात नाही की शहरात मोठ्या गुन्ह्याची घटना घडत नाही. ड्रग्ज तस्करीपासून ते कोयता गँगचे हल्ले, माजी नगरसेवकाची हत्या, ज्येष्ठ नागरीकांची लूट या घटनांमुळे पुणे क्राईम कॅपीटल होतेय की काय अशी भिती आहे. पाहूया एक स्पेशल रिपोर्ट...

शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात आता गुन्हेगारीचा ग्रहण लागलं आहे. कारण एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी शहरात मोठा गुन्हा घडत नाही. गेल्या चार दिवसात पुण्यात चार हत्येच्या घटना घडल्या आहेत. यामुळेच सुसंस्कृत, सांस्कृतीक राजधानी अशी ओळख असलेलं पुणे शहर आता क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे. गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीने कळस गाठला आहे.

पुण्यातील दोन महिन्यातील गुन्हेगारीच्या घटना पाहूया

विश्रांतवाडी भागातून एमडी ड्रग्सची विक्री

येरवडा, कोंढवा भागात वाहनांची तोडफोड

कोंढव्यात एटीएसकडून बनावट टेलिफोन एक्सचेंज उद्ध्वस्त

पोर्शेकार धडकेत दोन अभियंत्यांचा मृत्यू

सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला

माजी नगरसेवक वनराज आंदेकरांची हत्या

पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीमुळे विरोधक सुद्धा आक्रमक झालेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत पुणे हे सांस्कृतिक राजधानी वरून आता क्राइम कॅपिटल झालं आहे असं म्हणल्या आहेत. काँग्रेसनं थेट पोलिसांच्या पोस्टिंग वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गृहमंत्रालयावर हल्लाबोल केलाय. पोर्शे कार अपघातानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी कठोर पावलं उचलली. पोलिसांचं पेट्रोलिंग, रात्री मुख्य चौकात नाकाबंदी अशा अनेक उपाययोजना केल्या. मात्र नऊ दिवस नवलाईच्या प्रमाणे या उपाययोजना पुन्हा कागदावरच राहिल्या.

Pune Crime: पुण्यात हत्या, हल्ले, लूट काही थांबेना; विद्येचं माहेरघर की अंडरवर्ल्डचा अड्डा?
Pune Crime News: पुण्यात रक्तरंजित थरार, भररस्त्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार; भयानक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com