Delhi Firing News :  Saam tv
देश विदेश

Delhi Firing : राजधानीत गोळीबाराचा थरार! दिल्लीत दिवसाढवळ्या व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या, नागरिकांमध्ये दहशत

Delhi Firing News : राजधानी दिल्लीत गोळीबाराती घटना घडली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारात व्यावसायिकाचा मृत्यू झाला.

Vishal Gangurde

देशात व्यावसायिकांवर गोळीबाराच्या घटना सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईनंतर आता दिल्लीत गोळीबाराची घटना घडली. दिल्लीच्या पश्चिम विहारात व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी व्यावसायिकावर १० राऊंड फायरिंग केली. हल्लेखोरांनी अगदी जवळून व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या आहेत. व्यावसायिकावर गोळीबार झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दिल्लीच्या पश्चिम विहारात शुक्रवारी सकाळी गोळीबाराची घटना घडली. गोळीबारात व्यावसायिक जखमी झाला. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी व्यावसायिकाला मृत घोषित केले. मृत व्यावसायिकाच्या नातेवाईकांनी सांगितलं की, 'त्यांच्या मुलाची कोणासोबत शत्रूत्व नव्हतं. ते रोज कारने जिम करण्यासाठी जायचे. ते पेशाने प्रॉपर्टी डिलर होते'.

घरातून जिमला जाताना गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार, घरातून जिमला जाताना व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना घडली. हल्लेखोरांनी आधी राजकुमार यांना घेरलं. त्यानंतर त्यांनी ८ ते १० राऊंड फायरिंग केली. गोळ्यांच्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली. हल्लेखोरांनी व्यावसायिक राजकुमार यांची हत्या करून फरार झाले. व्यावसायिकाची हत्या केल्यानंतर लोक घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले.

राजकुमार पश्चिम विहार भागात राहत होते. राजकुमार प्रॉपर्टी डिलर म्हणून काम करत होते. राजकुमार कारमध्ये असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. कारमध्ये बेसावध असल्याची संधी साधून हल्लेखोरांनी गोळीबार केला. पोलिसांनी घटनेनंतर तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. पश्चिम विहार भागातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच राजकुमार यांच्या नातेवाईकांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा तपास करण्यास सुरुवात केली आहे.

राजधानी दिवसाढवळ्या घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गोळीबारामुळे नागरिक दहशतीत आहेत. व्यावसियाकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी मोठी अपडेट; मकर संक्रांतीच्या दिवशी ३००० रुपये होणार बँक खात्यात जमा? महत्वाची माहिती समोर

आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा, अनेक सरकारी कार्यालयं आंदोलकांच्या ताब्यात

प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! लोकल रेल्वेच्या वाहतूक वेळेत बदल; या मार्गांवर असणार मेगा ब्लॉक

National Flower Lotus: फक्त भारत नाही 'या' देशांचही आहे कमळ राष्ट्रीय फूल

Maharashtra Live News Update: अखेर अकोट नगरपालिकेत एमआयएमच्या 5 नगरसेवकांचा स्वतंत्र गट

SCROLL FOR NEXT