Shocking Incident : पोहण्याचा मोह जीवावर बेतला; तलावात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा

Chikhali News update : पोहण्याचा मोह दोन विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतला आहे. स्विमिंग पुलमध्ये बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
Chikhali
Chikhali News update :Saam tv
Published On

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाण्याच्या चिखली येथील डॉ. हेडगेवार -वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणारे दोन विद्यार्थी क्रीडा संकुलाच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. दोन्ही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. हे दोन्हीही विद्यार्थी बीड आणि अकोला जिल्ह्यातील आहेत. त्यांना भराड हॉस्पिटल येथे हलविण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. चिखलीत गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत तालुका क्रीडा संकुलाचा जलतरण तलाव आहे. या स्विमिंग टँकमध्ये, कडाक्याचे ऊन असल्याने पोहोणाऱ्यांची संख्या वाढली. डॉ. हेडगेवार वैद्यकीय महाविद्यालयाचे एकूण सहा ते सात विद्यार्थी या टँकमध्ये पोहोण्यासाठी आले होते. त्यापैकी विवेक अरूण वायले (वय २३, अकोला) आणि सूरज सुनील पानखडे (वय २१, बीड) हे विद्यार्थी पाण्यात बुडाले. त्यांना उपस्थितांनी बाहेर काढून तातडीने पोलिसांना कळवलं.

चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटील हे साथीदारांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोघांनाही बेशुद्ध समजून नजीकच्याच खामगाव रोडवरील भराड हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. परंतु, डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर मृत घोषित केले. या घटनेने चिखली शहरात हळहळ व्यक्त होत होत आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती कॉलेज व्यवस्थापनाला दिली होती. तसेच, या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही कळविण्यात आले आहे. पुढील तपास चिखली पोलिस करत आहेत.

तालुका क्रीडा संकुलातील या रेम्बो स्विमिंग पुलाचे कंत्राट विजय वाडेकर या कंत्राटदाराला देण्यात आले असल्याचे तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले आहे. परंतु, या कंत्राटदाराने या स्विमिंग टँकमध्ये पोहोण्यासाठी येणाऱ्यांकरिता सुरक्षेची काळजी घेतली नसल्याचे दिसून येत आहे.घटनास्थळी जीवरक्षक तैनात नव्हते, तसेच स्विमिंग टँकमध्ये प्रशिक्षकही तैनात नव्हता.

Chikhali
Ketaki Chitale : तो पळपुटा तामिळनाडूला पळाला, मी नाही; केतकी चितळेचा कुणाल कामराला टोमणा

त्यामुळे या दुर्देवी घटनेला जबाबदार धरून या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पुढे येत आहे. भराड रुग्णालयातून या दोन्हीही विद्यार्थ्यांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. तसेच, मुलांचे पालकदेखील चिखलीत पोहोचले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com