Ketaki Chitale : तो पळपुटा तामिळनाडूला पळाला, मी नाही; केतकी चितळेचा कुणाल कामराला टोमणा

Ketaki Chitale News : केतकी चितळेने कुणाल कामराला टोला लगावला आहे. पळपुटा तामिळनाडूला पळाला, म्हणत त्याने कुणाल कामरावर टीका केली आहे.
ketaki chitale
ketaki chitale on kunal kamra Saam tv
Published On

प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कवितेतून खिल्ली उडवल्याने वादात सापडलाय. शिंदे यांची खिल्ली उडवल्यानंतर त्याच्यामागे पोलिसांचा ससेमिरा लागला आहे. कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी आतापर्यंत तिसऱ्यांदा चौकशीसाठी नोटीस धाडली आहे. मात्र, कुणाल कामरा एकदाही चौकशीला हजर राहिला नाही. याच कुणाल कामराला आता अभिनेत्री केतकी चितळेने टोमणा मारला आहे. कुणाल कामरा पळपुटा असल्याचं म्हणत केतकीने त्याच्यावर टीका केली आहे.

ketaki chitale
Shocking : राज्यात आणखी एका रुग्णालयाचा हलगर्जीपणा उघड; ४०००० रुपयांसाठी सहा तास महिलेचा मृतदेह अडवून ठेवला

केतकी चितळेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत केतकी चितळे म्हणाली,'मला तुरुंगवास झाला, तेव्हा कुणाल कामरा माझ्यावर हसला होता. त्याचा स्क्रिनशॉट पाहू शकता. त्याने म्हटलं की, सरकार बदलेल तेव्हा स्वत: तुरुंगात जाण्यास तयार आहे. आता त्याचाविरोधात केस झाली. तेव्हा हा पळपुटा तामिळनाडूला पळाला. त्याच्यामध्ये हिंमत नाही. मी पळाले नव्हते. ही बाब पण खरी आहे की, मला माहीतच नव्हतं की काय सुरु आहे. माहीत जरी असतं, तरी मी पळाले नसते. कारण मी पळपुटी नाही'. केतकीचा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे. त्याचबरोबर लाईक केला आहे.

ketaki chitale
Dominican Republic Roof Collapse : नाइट क्लबच्या पार्टीत छत कोसळलं; १०० जण दगावले, सेलिब्रिटींचाही मृत्यू

केतकीच्या वक्त्यव्यावर तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. तुझा अभिमान वाटतोय, असे काहींनी म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं की, 'हे सर्व घडत असताना तुझी आठवण झाली. तू ग्रेट आहेस. तुझ्यावर शाईफेक झाली. तुला कारमध्ये बसवत नेण्यात आलं. त्यानंतर अटक झाली. तुरुंगवास झाला. कुणाल कामरा प्रकरणादरम्यान सर्व डोळ्यासमोर आलं. त्यानंतर परत एकदा चीड आली. खरं बोलणाऱ्याला या जगात जगण्याचाही हक्क मिळत नाही. तुला पुन्हा एकदा पाठिंबा'.

ketaki chitale
Dhananjay Munde : २ मुलांना जन्म दिला, एका घरात राहल्याशिवाय शक्य नाही; कोर्टाचा धनंजय मुंडेंना झटका

केतकीचं नेटकऱ्याला प्रत्युत्तर

नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना केतकी चितळे म्हणाली, 'सत्याचा मार्ग हा खडतर असतो. पण जीत? नेहमी सत्याचीच होते. वेळ लागतो पण विजय मिळतो. चिडून फायदा नाही. झोपलेल्या सनातनी हिंदूंना जागं करायला सुरुवात करा'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com