Ketaki Chitale : 'पूर्वी लोक स्वातंत्र्यासाठी लढले, आता आपल्याला...'; यशश्री शिंदे हत्या प्रकरणानंतर केतकी चितळे भडकली
Ketaki Chitale On Love JihadInstagram

Ketaki Chitale : 'पूर्वी लोक स्वातंत्र्यासाठी लढले, आता आपल्याला...'; यशश्री शिंदे हत्या प्रकरणानंतर केतकी चितळे भडकली

Actress Ketaki Chitale Video : नवी मुंबईच्या उरणमध्ये राहणार्‍या यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृणपणे हत्या करून तिचा मृतदेह झाडाझुडपामध्ये फेकून देण्यात आला होता. यशश्रीच्या हत्येनंतर अख्खा महाराष्ट्र हळहळला आहे.
Published on

नवी मुंबईच्या उरणमध्ये राहणार्‍या यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृणपणे हत्या करून तिचा मृतदेह झाडाझुडपामध्ये फेकून देण्यात आला होता. यशश्रीच्या हत्येनंतर अख्खा महाराष्ट्र हळहळला आहे. त्या तरूणीला न्याय मिळावा, यासाठी राज्यभरात मोर्चा वैगेरे काढले जात आहे. या प्रकरणाचे पडसाद नेते मंडळींसोबतच सेलिब्रिटी मंडळींकडूनही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तिच्यासाठी न्यायाची मागणी केली आहे.

Ketaki Chitale : 'पूर्वी लोक स्वातंत्र्यासाठी लढले, आता आपल्याला...'; यशश्री शिंदे हत्या प्रकरणानंतर केतकी चितळे भडकली
Sumona Chakravarti : कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन बायकोने शो का सोडला ? अभिनेत्री नव्या भूमिकेच्या शोधात

अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यासोबतच तिने सर्वांना एकत्र येण्याचेही आवाहन केले आहे. शिवाय, लव्ह जिहादबद्दलही तिने भाष्य केले आहे. व्हिडिओमध्ये केतकी म्हणते, "आपल्या मुली गायब होत आहेत, ते ही कुठे फ्रीजमध्ये, तर कधी कपाटात, तर कधी सुटकेसमध्ये आपल्या मुली सापडत आहेत. पुर्वी लोकं स्वातंत्र्यासाठी लढले, आता आपल्याला आपल्या धर्मासाठी लढायचं आहे."

केतकीच्या ह्या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले असून चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहे. केतकीच्या कामाबद्दल बोलायचे तर, केतकी गेल्या अनेक वर्षांपासून ती फिल्म इंडस्ट्रीपासून दुर आहे. ती इन्स्टाग्राम आणि युट्यूबच्या माध्यमातून आपलं परखड मत मांडण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या सोशल मीडिया पोस्टची कायमच चर्चा होते. केतकीला सर्वाधिक प्रसिद्धी स्टार प्रवाहवरील 'आंबट गोड' मालिकेतून मिळाली आहे.

Ketaki Chitale : 'पूर्वी लोक स्वातंत्र्यासाठी लढले, आता आपल्याला...'; यशश्री शिंदे हत्या प्रकरणानंतर केतकी चितळे भडकली
Javed Akhtar X Account Hack : जावेद अख्तर यांचं सोशल मीडिया अकाउंट हॅक, ऑलिम्पिकमधील भारतीय संघाबाबत ट्वीट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com