Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळे विरोधात दलित, मराठा बांधव आक्रमक; नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Ketaki Chitale News : अभिनेत्री केतकी चितळे नुकताच एका कार्यक्रमात ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. त्यांनंतर बीडच्या परळीत दलित आणि मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. केतकी चितळेवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.
Ketaki Chitale
Ketaki ChitaleSaam Digital
Published On

Ketaki Chitale

अभिनेत्री केतकी चितळे नुकताच एका कार्यक्रमात ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. त्यांनंतर बीडच्या परळीत दलित आणि मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. केतकी चितळेवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. केतकीने दलित समाजाबरोबरच मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली जात आहे. परळीत ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत केतकी चितळेने ॲट्रॉसिटी कायद्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केलं.

मराठी सिनेसृष्टीची 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री केतकी चितळे आपल्या वादग्रत व्यक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत आली आहेय सामाजिक असो वा राजकीय कोणत्याही विषयावर केतकी चितळे आपले मत मांडत असते. सोशल मीडियावर तिच्या पोस्ट नेहमी व्हायरल होतात. अनेकदा या पोस्टमुळे केतकी चितळे वादाच्या भोवऱ्यामध्ये देखील सापडली आहे. केतकीला नेटझन्स देखील ट्रोल करतात. असे असताना देखील केतकी चितळे मात्र आपले मत मांडायला मागे हटत नाही.

काय म्हणाली होती केतकी चितळे?

केतकी चितळेने परळी येथे नुकताच ॲट्रॉसिटी करणाऱ्यांचे रॅकेट सुरूअसल्याचं वक्तव्य केलं. परळीतील ब्राह्मण ऐक्य परिषदेत तिने हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या भाषणाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. परळी येथे ब्राह्मण समाजाची राज्यस्तरीय परिषद झाली. यावेळी केतकी चितळेने हजेरी लावली. या परिषदेमध्ये भाषण करत असताना केतकीने ॲट्रॉसिटी ॲक्टबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काही लोक ॲट्रॉसिटी ॲक्टचे रॅकेट चालवत असून याबाबत आरटीआय टाका आणि गेल्या ५ वर्षांची माहिती मिळवा, असे आवाहन तिने या परिषदेतून केलं होतं.

'बरेच वकील आहेत. मुंबईत एक वकील आहे ज्यांनी गेल्या १५ ते २० वर्षांत ६५ ॲट्रॉसिटीच्या केसेस केल्या आहेत. अनेक प्रकरणात त्यांचा साक्षीदार एकच असतो. असे अनेक वकील आहेत. हे अख्ख रॅकेट असून त्यांचे जोरात काम सुरू आहे. त्यामुळे ॲट्रॉसिटी कायदा रद्द करावा.', अशी मागणी केतकी चितळेने केली आहे. केतकी चितळे आता या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या तिच्या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. केतकीवर टीका देखील होऊ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com