Ulhasnagar Clash : पाया सूपची गाडी लावण्यावरून राडा; दिव्यांग तरुणाला टोळक्याकडून मारहाण, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Ulhasnagar fight News : उल्हासनगरमध्ये पाया सूपची गाडी लावण्यावरून राडा झाला. ५ ते ६ जणांनी दिव्यांग तरुणाला मारहाण केली.
Ulhasnagar
Ulhasnagar Clash Saam tv
Published On

उल्हासनगर : उल्हासनगरात पाया सूपची गाडी लावण्यावरून वाद झाल्याची घटना घडली. या वादातून दिव्यांग तरुणाला टोळक्याकडून मारहाण झाल्याची घटना घडली होती. ही मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दिव्यांग तरुणाला मारहाण झाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाकडून कारवाईची मागणी केली जात आहे.

Ulhasnagar
Shocking : बाप की हैवान? पोटच्या १६ वर्षीय मुलीवर वर्षभरापासून अत्याचार; गरोदर झाल्यावर नराधमाचा कारनामा उघड

उल्हासनगरात पाया सूपची गाडी लावण्यावरून वाद होऊन एका दिव्यांग शीख तरुणाला ५ ते ६ शीख तरुणांनीच मारहाण केल्याची घटना घडली. उल्हासनगरातील मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प ३ मध्ये राहणाऱ्या दिव्यांग तरुणाला मारहाण झाली आहे. कुलदीपसिंग लबाना असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प ३ मध्ये राहणारा कुलदीपसिंग लबाना हा खेमानी चौकात पाया सूपची गाडी लावतो. मात्र यावरून या परिसरात राहणारे गुरमित सिंग, अमर सिंग, छब्बू सिंग, बलबीर सिंग आणि निहाल सिंग हे शीख तरुण त्याच्याशी वाद घालत होते. 'तू आमच्या एरियात गाडी का लावतो? यावरून या तरुणांनी त्याला ११ वर्षांपूर्वीही मारहाण केली होती.

Ulhasnagar
Mumbai Chembur Firing : मुंबई हादरली! दोघे दुचाकीवरून आले, भर रस्त्यात केला बिल्डरवर गोळीबार

कुलदीप हा शुक्रवारी मुलींना सोडायला शाळेत जात असताना त्याला रस्त्यात गाठून या तरुणांनी त्याला पुन्हा एकदा कानशिलात लगावत गाडी लावण्यास मज्जाव केला. मात्र तरीही दुसऱ्या आठवड्यातील बुधवारी रात्री कुलदीपने खेमाणी चौकात पाया सूपची गाडी लावल्यामुळे गुरमित सिंग, अमर सिंग, छब्बू सिंग, बलबीर सिंग, निहाल सिंग या सर्वांनी कुलदीप याला घरात घुसून मारहाण केली.

Ulhasnagar
Ketaki Chitale : तो पळपुटा तामिळनाडूला पळाला, मी नाही; केतकी चितळेचा कुणाल कामराला टोमणा

प्रहार जनशक्ती पक्षाकडून इशारा

संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीतही कैद झालाय. मात्र याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेता फक्त एनसी नोंदवली असल्याची कुलदीप लबाना याची तक्रार आहे. तर पोलिसांनी या दिव्यांगाला न्याय न दिल्यास प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com