Beed Police:  मोठी बातमी! बीड पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासलेंनंतर आणखी २ पोलिस निलंबित, नेमकं कारण काय?
Beed Police Rajeet KasaleSaam Tv

Beed Police: मोठी बातमी! बीड पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासलेंनंतर आणखी २ पोलिस निलंबित, नेमकं कारण काय?

Beed Breaking News: बीड पोलिस दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बीड पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासलेंनंतर आणखी २ पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक नवनीत कावंत यांनी ही कार्यवाही केली आहे.
Published on

योगेश काशिद, बीड

बीडच्या पोलिस दलातून मोठी बातमी समोर आली आहे. सायबर विभागातील पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले यांच्यानंतर आणखी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक नवनीत कावंत यांनी ही कार्यवाही केली आहे. पोलिस हवालदार रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत यांना निलंबित करण्यात आले आहे. परवानगी न घेता गुजरातला जाणे या दोघंना महागात पडले. सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे त्यानंतर सायबर विभागाचे ठाणेदार देखील अडचणीत आले आहेत.

पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले आणि सहकारी भाग्यवंत तीव्र असताना खासगी वाहन घेऊन वरिष्ठांची परवानगी न घेता तपासासाठी गुजरातला गेले होते. तर यामधील गिरी नामक पोलिस हे देखील एका बैठकीमध्ये युनिफॉर्ममध्ये बसल्याचे दिसत आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयामधील सायबर विभागातील पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले यांचे नवनवीन कारनाम्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Beed Police:  मोठी बातमी! बीड पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासलेंनंतर आणखी २ पोलिस निलंबित, नेमकं कारण काय?
Beed Ash Mafia: बीडच्या राख माफियांना दणका; वाल्मिक कराडच्या साम्राज्याची 'राख'

या व्हिडिओनंतर पोलिस अधीक्षक नवनीत कावंत यांनी याची सखोल चौकशी झाली पाहिजे असे आदेश दिले होते. या चौकशांती पोलिस उपनिरीक्षक रणजीत कसलेला निलंबित करण्यात आले तर दुसरीकडे त्याच्यासोबत गेलेले दोन कर्मचारीही पोलिस अधीक्षक नवनीत कावंत यांनी निलंबित केले आहेत. आता यानंतर सायबर विभागातील ठाणेदारावरही निलंबनाची टांगती तलवार आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विभागातील ठाणे प्रमुखाचा अहवाल पाठवण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक नवनीत कावंत यांनी दिली आहे.

Beed Police:  मोठी बातमी! बीड पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासलेंनंतर आणखी २ पोलिस निलंबित, नेमकं कारण काय?
Beed Crime: 'तुम्ही आतमध्ये असल्यामुळे वाचलात, नाही तर संतोष देशमुखपेक्षा वाईट हाल केलं असतं'; सुदर्शन घुलेची महादेव गितेला धमकी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com