अक्षय बडवे
पुणे : शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करुन ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखवत पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकारात तब्बल १ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याबाबत दाखल तक्रारीवरून पोलिसांनी तपास करत फसवणूक प्रकरणी ६ जणांना ताब्यात घेतले आहे. हे सर्व तरुण उच्च शिक्षित आहेत.
पुण्यातील जेष्ठ नागरिक यांना व्हॉट्सअँप कॉलद्वारे शेअर मार्केट इन्व्हेसमेंटबाबत अनन्या गुप्ता या महिलेने संपर्क केला. तसेच त्यांना एका व्हॉट्सअँप ग्रुपमध्ये ॲड करण्यात आलं. ज्येष्ठ नागरिकाला विविध नंबर वरून संपर्क साधुन शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करुन चांगला परतावा मिळेल; असे सांगून वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे लाटले. ही रक्कम तब्बल १ कोटी ६० लाख रुपयांपर्यंत गेली.
खात्यात ५ लाख रुपये रक्कम चेकव्दारे विड्रॉल
मात्र अनेक दिवस झाल्यानंतर देखील कुठलाच परतावा मिळत नसल्याने या फसवणूक झाल्याचे ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात जात या प्रकरणी तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांना तपासादरम्यान पुण्यातील वाघोली येथील आयडीएफसी बँक खात्यात ५ लाख रुपये रक्कम चेकव्दारे विड्रॉल झाल्याचे निष्पन्न झाले.
बँक खातेदाराला घेतले ताब्यात
सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंगलदार यांनी तात्काळ बँकेत जाऊन खात्याचे खातेधारक संशयित केतन याला ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी बँक खाते व मोबाईल क्रमांक यांचे तांत्रिक तपास केला असता त्यात संशयित आरोपी गोविंद सुर्यवंशी व रोहित कंबोज, जब्बरसिंह पुरोहित यांचा सहभाग असल्याचे दिसल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले.
फसवणूक करणारे सर्व उच्च शिक्षित
यातील गोविंद सुर्यवंशी हा पुण्यातील वाघोली परिसरातील विघ्नेश्वर गल्टीस्टेट को. ऑप. बँकेचा संचालक असून या बँकेच्या टेक्निकल कामात आरोपी रोहित कंबोज काम करत असल्याने त्याचा फायदा घेतला आहे. दोघे बी.टेक, उच्च शिक्षित असून त्यांच्या डिगीव्हेंटरी वननेस, रजत सेल अशा डिजिटल मार्केटिंग नावाच्या कंपन्या आहेत. तर गोविंद सुर्यवंशी व रोहित कंबोज हे दोघे क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारामध्ये सक्रिय असुन त्यांनी त्याव्दारे अनेक युएसडीटी आरोपी जब्बरसिंह पुरोहित याला दिले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच गुन्ह्यातील बँक खाते बनवुन त्याचा पुरवठा करणारा आरोपी निखिल ऊर्फ किशोर सातव यास देखील पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.