अक्षय शिंदे
जालना : जालन्यातील परतूर शिक्षणाधिकारी कार्यालयअंतर्गत शिक्षकांच्या आयकर भरण्यासाठी जमा करण्यात आलेली रक्कम शालार्थ वेतन प्रणालीचे काम करणाऱ्या शिक्षकाने स्वतःच्या खात्यावर जमा केली. यातून साधारण १ कोटी ३४ लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गटशिक्षणाधिकारीसह शालार्थ समन्वय शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषद सीईओनी दिले आहेत.
जालन्याच्या परतुर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालया अंतर्गत असणाऱ्या शिक्षकांचा दर महिन्याला आयकर कपात केला जातो. ही कपात केलेली रक्कम गटशिक्षणाधिकारी यांच्या खात्यातून स्वतःच्या खात्यात वर्ग करण्याचा कारनामा परतूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शालार्थ समन्वयक सहशिक्षक चंद्रकांत पौळ यांनी केला. यात सुमारे १ कोटी ३४ लाख ४५ हजार ४३८ रुपयांचा अपहार करण्यात आला आहे.
१४ वेळा रक्कम स्वतःच्या खात्यात वळवली
परतुर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालय अंतर्गत असणाऱ्या शिक्षकांचा दर महिन्याला आयकर कपात केला जातो. ही रक्कम शालार्थ समन्वयक सहशिक्षक चंद्रकांत पोळ यांनी चौदा वेळा स्वतःच्या खात्यात वळवल्याचे समोर आले आहे. यात १ कोटी ३४ लाख ४५ हजार ४३८ रुपयांची एकूण रक्कम आहे. दरम्यान, अपहार केलेल्या या रकमेपैकी चंद्रकांत पौळ यांनी यापूर्वीच काही रक्कम भरलेली आहे. तूर्तास सुमारे ५० लाख रुपये चंद्रकांत पोळ यांच्याकडे बाकी आहे
आयकरच्या नोटीस आल्याने प्रकरण उघडकीस
परतुर गटशिक्षणाधिकारी कार्यालय अंतर्गत जवळपास ५४२ शिक्षक काम करतात. या शिक्षकांनी वर्षभर आपल्या पगारातून आयकर कर देखील जमा केला. मात्र या शालार्थवर काम करणाऱ्या प्रभारी शिक्षकाने ही रक्कम १४ वेळा स्वतःच्या खात्यात वळवली होती. मात्र शिक्षकांनी वर्षभर कर भरून देखील मार्च अखेरीस या शिक्षकांना आयकर विभागाच्या नोटिसा प्राप्त झाल्या. यामुळे परतुरमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल आहे.
दोघांचे निलंबन
दरम्यान या अपहार प्रकरणी शालार्थवर काम करणाऱ्या प्रभारी शिक्षकासह गटशिक्षणाधिकारी, गट समन्वयक यांनी देखील त्या खात्यातून स्वतःच्या नावे धनादेशाद्वारे रक्कम उचलल्याच समोर आल आहे .त्यामुळे आता याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी आणि त्या शालार्थवर काम करणाऱ्या शिक्षकांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांना मुख्य कार्यकारी अधिकारी दिले आहेत. तर अद्याप या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन गटशिक्षणाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या अनेकांचे निलंबन होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.