KDMC School : केडीएमसीच्या शाळांमध्ये होणार सौरउर्जा निर्मिती; पाथर्ली शाळेतील प्रकल्पाचा शुभारंभ

Kalyan News : काही दिवसांपासून सोलर ऊर्जेचा वापर वाढला आहे. या अनुषंगाने केडीएमसीच्या विद्युत विभागातर्फे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीएसआर फंडाच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात येत आहेत
KDMC School
KDMC SchoolSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळांचा चेहरा मोहरा बदलण्याचा केडीएमसीकडून प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीच्या विद्युत विभागाकडून केडीएमसी शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात येणार आहेत. डोंबिवलीच्या पाथर्ली येथील आचार्य भिसे गुरुजी या ६२ क्रमांकाची शाळा आता पहिली सोलर शाळा म्हणून ओळखली जाणार आहे. 

मागील काही दिवसांपासून सोलर ऊर्जेचा वापर वाढला आहे. या अनुषंगाने केडीएमसीच्या विद्युत विभागातर्फे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीएसआर फंडाच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात येत आहेत. याची सुरुवात पाथर्लीच्या आचार्य भिसे गुरुजी शाळेपासून करण्यात आली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्या हस्ते या शाळेतील सौरउर्जा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.

KDMC School
Trimbakeshwar News : तिरुपती, शिर्डीप्रमाणे त्र्यंबकेश्वरमध्येही भाविकांना बुंदी लाडूचा प्रसाद; आजपासून वाटपास सुरवात

सौरऊर्जेवर चालणारी पहिली शाळा 

पाथर्ली येथील शाळेमध्ये चार किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यामुळे पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारी ही कल्याण डोंबिवलीतील पहिली शाळा ठरणार आहे. रिजन्सी निर्माण ग्रुपचे अनिल भतीजा यांच्या आर्थिक सहकार्यातून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. कल्याण डोंबिवलीच्या शाळांची परिस्थिती आणि त्यांतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही भर देत आहोत. ज्याचे दृश्य परिणाम येत्या वर्षापासून आपल्याला दिसू लागतील असे आयुक्त डॉ. जाखड यांनी यावेळी स्पष्ट केले. 

KDMC School
Swabhimani Shetkari Sanghatna : शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना आक्रमक; जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतमालाची गुढी उभारून निषेध

उर्वरित शाळांमध्येही राबविणार सोलर प्रकल्प 

कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या उर्वरित ५९ शाळांमध्येही लोकसहभागातून असे सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील सामाजिक संस्था, विकासक आदींशी संपर्क साधला असून लवकर इतर सर्व शाळांवरही सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याचे सूतोवाच विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com