Shocking News
karnataka Shocking News Saam tv

Shocking : बाप की हैवान? पोटच्या १६ वर्षीय मुलीवर वर्षभरापासून अत्याचार; गरोदर झाल्यावर नराधमाचा कारनामा उघड

karnataka Shocking News : कर्नाटकात पोटच्या १६ वर्षीय मुलीवर वर्षभरापासून अत्याचार करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगी गरोदर झाल्यावर नराधमाचा कारनामा उघड झाला.
Published on

कर्नटकाच्या गडग जिल्ह्यातील मुलांगड पोलीस स्टेशनच्या बद्दीत खळबळजनक घटना घडली आहे. नराधम बापाने पोटच्या लेकीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. लेक गरोदर झाल्यावर ५१ वर्षीय बापाचा कारनामा उघड झाला. या प्रकरणी पोलिसांनी बापाला अटक केली आहे. पोलिसांनी पुढील कारवाई देखील सुरु केली आहे.

 Shocking News
Central Railway : मुंब्रा स्टेशनच्या ट्रॅकजवळ भीषण आग, प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ, VIDEO व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय मुलीच्या पायावर सूज आली होती. त्यामुळे मुलगी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी स्कॅनिंग आणि रक्त तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी पीडित मुलीच्या आईला मुलगी ३१ आठवड्यांची गरोदर असल्याचं सांगितलं. आईने मुलीशी विचारल्यानंतर तिने खुलासा केला. घरात कोणी नसताना वडील मागील एक वर्षांपासून अत्याचार करत असल्याचे मुलीने आईला सांगितले.

 Shocking News
Prashant Koratkar bail : मोठी बातमी! इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण, प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला कुटुंबातील कोणाला सांगितल्यास गंभीर भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती. 'पीडित मुलीच्या आईने मुलागुंड पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीच्या आधारावर भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो अंतर्गत अत्याचार आणि धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी मंगळवारी आरोपी बापाला अटक केली.

 Shocking News
Mumbai Chembur Firing : मुंबई हादरली! दोघे दुचाकीवरून आले, भर रस्त्यात केला बिल्डरवर गोळीबार

पीडित मुलीचं समुपदेशन करण्यात आलं आहे. वैद्यकीय चाचणी केल्यानंतर पोलिसांकडून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. पीडित मुलीला एक २० वर्षीय मोठी बहीण आहे. तिची बहीण एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. तिला एका लहान भाऊ आहे. छोटा भाऊ इयत्ता पाचवीत शिकत आहे. बापाच्या कारनाम्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्धस्त झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com