Prashant Koratkar bail : मोठी बातमी! इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण, प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर

Kolhapur court news : इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. या प्रकरणात प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालाय..
Prashant Koratkar Cars
Prashant Koratkar saam tv
Published On

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

कोल्हापुरातून मोठी बातमी हाती आली आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन महापुरुषांची बदनामी प्रकरणात महत्वाची अपडेट हाती आली आहे. या प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकर याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटरला जामीन मंजूर केला आहे.

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्याशी बोलताना प्रशांत कोरटकरने शिवीगाळ केली होती. प्रशांत कोरटकरवर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केल्याचा आरोप झाला. त्यानंतर प्रशांत कोरटकरवर कोल्हापूरसहित राज्यातील विविध भागात फौजदारी गुन्हे नोंदवण्यात आले. पोलिसांत गुन्हे नोंदवल्यानंतर कोरटकर फरार झाला होता. पुढे कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळल्या होत्या.

Prashant Koratkar Cars
CNG Price Hike : महागाईचा आणखी एक दणका; पेट्रोल-डिझेलनंतर सीएनजी गॅसच्या दरात वाढ, किती रुपयांनी वाढले दर?

प्रशांत कोरटकर गेल्या काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत होता. त्यानंतर आज बुधवारी प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायाधीश डी.व्ही.कश्यप यांनी जामीन मंजूर केला. त्यामुळे आता लवकरच कळंबा कारागृहातून कोरटकरची सुटका होणार आहे.

Prashant Koratkar Cars
Nashik News : कंडोमचं पाकीट, फायटर अन् लोखंडी कडे; आठवीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात आक्षेपार्ह साहित्य, VIDEO

कोरटकर तुरुंगातून कधी बाहेर पडणार?

प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाल्यानंतर कळंबा कारागृहाबाहेर हालचाली वाढल्या आहेत. कारागृहाबाहेर पोलिस कर्मचारी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. जामीन मंजूर झाल्यावर प्रशांत कोरटकर हा कळंबा कारागृहातून बाहेर पडणार आहे. कोरटकर आज बाहेर पडणार की उद्या सकाळी हे पाहणे महत्वाचे आहे.

कोरटकर अजून दोन दिवस तरी बाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. कोर्टात जामिनाची प्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र, कोर्टाला महावीर जयंतीमुळे उद्या सु्ट्टी आहे. त्यामुळे हे काम शुक्रवारी होईल. त्यामुळे कोरटकरची थेट शुक्रवारी सुटका होण्याची शक्यता आहे.

Prashant Koratkar Cars
Dominican Republic Roof Collapse : नाइट क्लबच्या पार्टीत छत कोसळलं; १०० जण दगावले, सेलिब्रिटींचाही मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com