Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर 1 एप्रिल रोजी सुनावणी, VIDEO

Judicial custody decision on Prashant Kortkar case: शिवद्रोही प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर 1 एप्रिल रोजी सुनावणी पार पडणार आहे.

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकावणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारा प्रशांत कोरटकर याला न्यायालयाने आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर कोरटकरने जामिनीसाठी अर्ज केला. ही सुनावणी आता 1 एप्रिलला होणार आहे.

कोल्हापूर पोलिसांनी 24 मार्च रोजी प्रशांत कोरटकर याला ताब्यात घेतल्यानंतर 25 मार्चला त्याला पहिल्यांदा न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर 28 मार्चला पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आज त्याला परत न्यायालयात हजर केले होते. यावेळी त्याला न्यायालयाने 14 दिवसांच्या न्यायालयात रवानगी केली आहे. मात्र त्याने लगेचच जामिनासाठी अर्ज केला आणि आता ही सुनावणी 1 एप्रिल रोजी पार पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com