beer price down  Saam tv
देश विदेश

Beer Price Down : बिअरप्रेमींसाठी मोठी खुशखबर; 200 रुपयांची बिअर अवघ्या 50 रुपयांत मिळणार? वाचा सविस्तर

fact check about Beer Price Down : तुम्ही जर बिअरप्रेमी असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच 200 रुपयांची बियर 50 रुपयांत मिळणार आहे. हे आम्ही म्हणत नाहीये, तर सोशल मीडियात तसा मेसेज व्हायरल होतोय. साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली. तेव्हा स्वस्त बिअरमागचं नेमकं सत्य काय आहे ते समोर आलं..

Vinod Patil

बिअर म्हटली की अनेक मद्यप्रेमींच्या उत्साहाला उधाण येतं. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बिअरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि अनेकदा आपली आवडती थंड बिअर आणि ब्रँड मिळणं कठीण होतं. अशातच 200 रुपयांची बिअर लवकरच 50 रुपयांत मिळणार अशा आशयाचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. सरकार बिअरवरील टॅक्स कमी करणार असल्याचा दावा केला जातोय.

बिअर प्रेमींसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे. मात्र खरंच बिअर स्वस्त होणार आहे का? बिअर स्वस्तात विकणे सरकारला परवडू शकतो का? असे सवालही या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. व्हायरल मेसेजची आम्ही पडताळणी केली. मात्र त्यापूर्वी या मेसेजमध्ये नेमका काय दावा करण्यात आलाय, ते पाहूयात..

व्हायरल मेसेसमध्ये म्हटलं आहे की, बिअर प्रेमींसाठी खुशखबर..200 रुपयांची बिअर आता 50 रुपयांत मिळणार. भारताने ब्रिटनच्या बिअरवरील कर तब्बल 75 टक्क्यांनी कमी केला आहे. यामुळे बिअर आता स्वस्त दरात मिळेल.

हा मेसेज व्हायरल होत असल्यामुळे बिअर प्रेमींच्या आनंदाला उधाण आलय. हा मेसेज पाहिल्यानंतर अनेकांनी लगेचच चिअर्स करून एकमेकांना शुभेच्छा देण्यासही सुरुवात केलीये. मात्र व्हायरल होत असलेला मेसेज खरा आहे का? खरंच 200 रुपयांची बिअर अवघ्या 50 रुपयात मिळणार आहे का? असे सवाल उपस्थित झाले आहेत. साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली. याबद्दल लिकर इंडस्ट्रीतले तज्ञ अधिक माहिती देऊ शकतात. त्यामुळे आम्ही त्यांच्या कडून अधिक माहिती घेतली तेव्हा त्यांनी काय सांगितलं पाहा...

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा

व्हायरल सत्य काय?

भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या 6 मे रोजी एक करार झाला असून या करारानुसार ब्रिटनमधून आयात होणाऱ्या दारू वरील आयातशुल्क 75 टक्क्यांनी कमी करण्यात आलय. मात्र बिअर इंडस्ट्री ही बॉटलिंग इंडस्ट्री आहे. शिवाय आयात शुल्कात घट झाली असली तरी दारूवर शुल्क आकारण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे तूर्तास तरी बिअर स्वस्त होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. मात्र भारत-ब्रिटन करारामुळे ब्रँडेड व्हिस्की काही प्रमाणात स्वस्त मिळू शकते.

त्यामुळे आमच्या पडताळणीत 200 रुपयांची बिअर 50 रुपयात मिळेल हा दावा असत्य ठरलाय. आयात शुल्क कमी झाल्यामुळे ब्रँडेड व्हिस्कीच्या दरात थोडीफार कपात होऊ शकते. मात्र ब्रिटनमधून आयात होणाऱ्या दारूवरील टॅक्स लक्षात घेता, दारू सरसकट स्वस्त होण्याची शक्यता कमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना आमदाराच्या पत्नीसमोर चित्रलेखा पाटील म्हणाल्या ५० खोके...; सुरूवातीला बाचाबाची नंतर धक्काबुक्की; VIDEO व्हायरल

Ban Online Betting Games: मोदी सरकारचा आणखी एक स्ट्राईक; ऑनलाइन बेटिंग गेम्सवर आणणार बंदी

Crime: दारूच्या नशेत बायकोवर कुऱ्हाडीने वार, नंतर धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या; जळगाव हादरले

Maharashtra Rain: राज्यात पावसाचे धुमशान! रेल्वेसेवेला मोठा फटका, २०-२१ ऑगस्टला लांबपल्ल्याच्या ट्रेन्स रद्द; वाचा लिस्ट

Maharashtra Rain Live News: मुंबईसाठी उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट, शाळां-महाविद्यालयांच्या सुट्टीबाबत अद्याप निर्णय नाही: BMC

SCROLL FOR NEXT