
तुम्ही जर 1500 रुपयांसाठी एखाद्या भामट्याकडून बँकेत खातं काढलं असेल तर सावध व्हा. होय. अन्यथा तुमचं लाडकी बहिणचं खातं तुम्हाला गोत्यात आणेल. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारनं सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेचा वापर करुन सायबर गुन्हेगारांचे फावलंय. या योजनेच्या नावाखाली आंतराज्यीय गुन्हेगार सायबर गुन्हे करुन देशभरातील लोकांना लुटतायेत. तुम्ही जे ऐकताय ते अगदी खरंय. लाडकी बहिणचा वापर करुन महिलांचे आणि सर्वसामान्य नागरिकांचे खाते काढून देशभरात सायबर गुन्हे करणाऱ्या चौकडीला पोलिसांनी आता कोठडीत टाकलंय.
मुंबईतील जुहूमध्ये पोलिसांनी सखोल तपास करत हे रॅकेट उद्धवस्त केलंय. या गॅगचीं मोडस ऑपरेंडी कशी होती पाहुयात
झोपडपट्टीतील नागरिकांची 'लाडकी बहीण'च्या नावाखाली उघडली बँक खाती
बँक खातं उघडताच तत्काळ महिलांना दिले 1 हजार रुपये
बँक खात्यांचा तपशील गुजरातमधील आरोपीला पुरवला
प्रत्येक खात्यामागे आरोपींनी केली 4 हजारांची कमाई
अडीच हजार बोगस बँक खाती उघडल्याची शक्यता
दरम्यान सर्वसामान्यांच्या नावावर सायबर गुन्हे करण्यात येत होते तर अनेकांच्या खात्यात काळा पैसा दडवून ठेवण्यात आलाय. त्यामुळे धारावी, डि एन नगर, नेहरुनगर आणि देवनार मधील गरीब महिलांच्या नावावर कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करुन त्यांच्या कडून मोठ्या प्रमाणात खाते पुस्तक आणि 19 लाख 43 हजारांची रोख जप्त केलीय.
चौकशीनंतर बँकांशी संपर्क साधून 100 हून अधिक खाती बंद करण्यात आलीयेत. मात्र सर्वसामान्यांच्या बँक खात्याचा वापर करुन गब्बर झालेला गुजरातचा प्रतिक पटेल सध्या फरार आहे. पोलिस त्याच्या मुसक्या आवळून हा मोठा अपहार कसा उघड करतात याकडे देशाचं लक्ष लागून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.