Bank Loan: ग्राहकांना मोठा दिलासा! PNB, BOB आणि कॅनरा बँकेचा EMI होणार कमी, कारण....

BOB PNB And Canara Bank Reduce MCLR Rate: बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि कॅनेरा बँकेने MCLR रेट कमी केले आहेत.
Bank Loan Interest
Bank Loan InterestSaam Tv
Published On

सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना खुशखबर दिली आहे. या तिन्ही बँकांनी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट्समध्ये (MCLR) कपात केली आहे. याचा परिणाम थेट कर्जाच्या व्याजदरावर होणार आहे. या तिन्ही सरकारी बँकांनी ग्राहकांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

एमसीएलआपमध्ये कपात केल्याने होम लोन, पर्सनल लोन, ऑटो लोनमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. यामुळे आता ग्राहकांना कमी ईएमआय भरावा लागणार आहे. त्यामुळे कर्जाची परतफेडदेखील लवकरच होईल.

Bank Loan Interest
RBI चा १०० आणि २०० रुपयांच्या नोटांबाबत मोठा निर्णय! सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

MCLR रेट म्हणजे काय?

MCLR हे व्याजदर असते. ज्याच्या आधारावर बँक लोन देते. हे व्याजदर बँकेच्या फंडिंग खर्चाच्या आधारावर ठरवले जाते. जेव्हा बँका MCLR रेट कमी करतात तेव्हा त्याचा फायदा थेट कर्जदारांना होतो.

बँक ऑफ बडोदाचे नवे MCLR रेट

ओवरनाइटसाठी MCLR रेट ८.१५ टक्के आहे.

१ महिन्यासाठी MCLR रेट ८.३५ टक्के आहे.

३ महिन्यासाठी MCLR रेट ८.५५ टक्के आहे.

६ महिन्यासाठी MCLR रेट ८.८० टक्के आहे.

१ वर्षासाठी MCLR रेट ८.९५ टक्के आहे.

Bank Loan Interest
Bank Jobs: इंडियन ओव्हरसीज बँकेत नोकरीची संधी; ४०० पदांसाठी निघाली भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

कॅनरा बँकेचे नवे दर

कॅनरा बँकेने MCLR रेटमध्ये ५ ते १० बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे.

ओवरनाइटसाठी MCLR रेट ८.२० टक्के आहे.

१ महिन्यासाठी MCLR रेट ८.२५ टक्के आहे.

३ महिन्यासाठी MCLR रेट ८.४५ टक्के आहे.

६ महिन्यासाठी MCLR रेट ८.८० टक्के आहे.

१ वर्षासाठी MCLR रेट ९.०० टक्के आहे.

पंजाब नॅशनल बँकेचे नवे दर

ओवरनाइटसाठी ८.२५ टक्के MCLR दर निश्चित करण्यात आहे.

१ महिन्यासाठी ८.४० टक्के MCLR रेट आहे.

३ महिन्यासाठी ८.६० टक्के MCLR रेट आहे.

६ महिन्यासाठी ८.८० टक्के MCLR रेट निश्चित करण्यात आले आहेत.

३ वर्षासाठी ९.२५ टक्के MCLR रेट निश्चित करण्यात आले आहे.

MCLR रेट कमी केल्याचा सर्वाधिक फायदा कर्जदारांना मिळणार आहे. यामुळे ईेमआय कमी होणार आहे. होन लोन, ऑटो लोनवरील कर्जाचा हप्ता कमी होणार आहे.

Bank Loan Interest
Repo Rate: RBI ने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर ३ बँकांचा मोठा निर्णय! कर्जावरील व्याजदरात केली कपात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com