RBI चा १०० आणि २०० रुपयांच्या नोटांबाबत मोठा निर्णय! सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

RBI Decision For 100 And 200 Rupees Notes: रिझर्व्ह बँकेने १०० आणि २०० रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता एटीएममध्ये १०० आणि २०० रुपयांच्या नोटा ठेवणे अनिवार्य असणार आहे.
RBI
RBISaam Tv
Published On

सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने एटीएमसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अनेकदा एटीएममधून आपल्याला ५०० रुपयांच्या नोटा मिळतात. परंतु आपल्याला सुट्टे पैसे हवे असतात. अशा परिस्थितीत आपल्या दुसऱ्या कोणाकडून तरी ५०० रुपये सुट्टे घ्यावे लागतात. त्यामुळे बराच वेळ वाया जातो.परंतु आता यावर रिझर्व्ह बँकेने तोडगा काढला आहे. रिझर्व्ह बँकेने एटीएममध्ये १०० आणि २०० रुपयांच्या नोटा जास्त ठेवण्याचे निर्देश बँका आणि एटीएम ऑपरेटर्संना दिले आहेत.

RBI
RBI: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! एटीएममधून पैसे काढणे आता महागणार; व्यवहार शुल्कात केली वाढ

रिझर्व्ह बँकेने निर्देश दिले आहेत. यामुळे एटीएममधून आता तुम्हाला १०० आणि २०० रुपयांच्या जास्तीत जास्त नोटा मिळणार आहे. या निर्णयाने बँकांचे लक्ष वेधले आहेत. आरबीआयने आपल्या निर्देशात म्हटलंय की, सर्वसामान्या नागरिकांना नोट उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे करणे गरजेचे आहे. एटीएममधून १००,२०० रुपयांच्या नोटा उपलब्ध व्हायला हव्यात.

रिझर्व्ह बँकेने काय सांगितलं?

रिझर्व्ह बँकेने सर्व बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्संना सांगितले की, याची टप्प्याटप्प्याने अंबलबजावणी व्हायला हवी. व्हाईल लेबल एटीएम हे सरकारी आणि खाजगी बँकांसारखेच काम करतात. आरबीआयच्या या निर्णयाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असंही सांगण्यात आले आहे.

RBI
LIC Scheme: एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १२००० रुपयांची पेन्शन मिळवा; LIC ची जबरदस्त योजना

रिझर्व्ह बँकेने सांगितले की, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत एटीएमपैकी ७५ टक्के एटीएममध्ये एक कॅसेट ही १०० किंवा २०० रुपयांच्या नोटांनी भरलेली असावी. एका कॅसेटमध्ये २५०० नोटा असतात. ही एक पेटी १००-२०० रुपयांच्या नोटांची असणे अनिवार्य आहे. एका एटीएममध्ये चार किंवा ६ कॅसेट असतात. ३१ मार्च २०२६ पर्यंत ९० टक्के एटीएममध्ये १कॅसेट १००,२०० रुपयांच्या नोटांची असावी, असं आरबीआयने सांगितले आहे.

RBI
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! रोज ३३३ रुपये गुंतवा अन् फक्त व्याजातून ५ लाख कमवा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com