RBI: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! एटीएममधून पैसे काढणे आता महागणार; व्यवहार शुल्कात केली वाढ

RBI Increase ATM Cash Withdrawal Cost: सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ मे २०२५ पासून एटीएममधून पैसे काढणे महागणार आहे.
ATM
ATM Saam Tv
Published On

मे महिना सुरु व्हायला अवघे ३ दिवस उरले आहेत. मे महिन्यात सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. आता १ मे २०२५ पासून एटीएममधून पैसे काढणे अजून महागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएम चार्चमध्ये वाढ करण्यासाठी मंजुरी दिली आहे. हा नियम १ मेपासून लागू होणार आहे. यामुळे पूर्वी एटीएममधून पैसे काढण्यासाठी जेवढे शुल्क लागायचे ते वाढवले आहे.

ATM
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! रोज ३३३ रुपये गुंतवा अन् फक्त व्याजातून ५ लाख कमवा

ATM शुल्कात कितीने वाढ केली?

नवीन नियमांनुसार, एटीएममधून पैसे काढण्यासाठी फ्री ट्रान्झॅक्शन लिमिट पार केल्यानंतर प्रत्येक व्यव्हारावर २३ रुपये शुल्क लागणार आहे. आता हे शुल्क २१ रुपये आहेत. त्यामुळे लिमिटपेक्षा पैसे काढण्यासाठी तुम्हाला २३ रुपये चार्ज द्यावा लागणार आहे. १ मे २०२५पासून हे नियम लागू होणार आहे.

फ्री ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये बदल नाही

ग्राहकांच्या फ्री ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. एटीएममधून (ATM) तुम्ही ५ वेळा फ्रीमध्ये पैसे काढू शकतात. त्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर शुल्क भरावे लागणार आहे. मेट्रो शहरांमध्ये ३ ट्रान्झॅक्शन फ्री आहेत. तर नॉन मेट्रो शहरांमध्ये ५वेळा तुम्ही कोणत्याही शुल्काशिवाय पैसे काढू शकतात. यानंतर तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत.

ATM
Bank Rules: तुमच्या खात्यात चुकून कोटी रुपये आले तर काय कराल? जाणून घ्या कायदा काय सांगतो

ATM मधील शुल्कात वाढ का होते?

थर्ड पार्टी ATM ऑपरेटर आणि बँक गेल्या अनेक दिवसांपासून एटीएममधील शुल्कांमध्ये वाढ करण्याची मागणी करत होते. ऑपरेटिंग कॉस्ट वाढल्याने एटीएम ऑपरेट करताना नुकसान होत आहे. दरम्यान, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने रिझर्व्ह बँकेकडे चार्ज वाढण्याची शिफारस केली होती. याला आता मंजुरी देण्यात आली आहे.

ATM
ATM News: ATM मधून पैसे काढणे महागणार, बॅलन्स चेक केला तरी अकाउंट बॅलन्स कमी होणार, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com