रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार, दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढणे आता अधिक महाग होणार आहे. 1 मेपासून हा बदल लागू होणार आहे. ठराविक मर्यादेनंतर दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास, आता प्रति व्यवहार 17 रुपयांऐवजी 19 रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच, बॅलन्स तपासण्यासाठी आकारले जाणारे शुल्क 7 रुपयांवरून वाढवून 9 रुपये करण्यात आले आहे.
एटीएम शुल्क वाढवल्यामुळे, एटीएम नेटवर्क ऑपरेटर आणि व्हाईट लेबल एटीएम कंपन्यांकडून इंटरचेंज फी वाढवण्याची मागणी होत आहे. सध्या एटीएमचे देखभाल व संचालन खर्च पूर्वीपेक्षा लक्षणीय वाढले आहेत. याच पार्श्वभूमीवर, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ही मागणी आरबीआयसमोर मांडली होती, आणि आता आरबीआयने त्याला हिरवा कंदील दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.