
तुमच्या खात्यात अचानक एखादी मोठी रक्कम जमा झाली आहे का? तुम्हाला ते कधी मिळालं नसेल तरी तुम्ही अशा अनेक बातम्या ऐकल्या असतील. की कोणाच्या तरी खात्यात अचानक करोडो रुपये जमा झाले आहेत. तुम्हाला असं वाटतं का की, तुमच्या खात्यात कधीतरी असे पैसे जमा होतील आणि त्याच्यावर आपण आपला हक्क दाखवू शकतो. थांबा थांबा असा विचार तर अजिबातच करू नका. कारण असं करणं बेकायदेशीर आहे. तुम्हाला शिक्षा देखील होऊ शकते बरं का.
जर चुकून तुमच्या बँक खात्यात अनोळखी व्यक्तीकडून किंवा बँकेच्या चुकीमुळे मोठी रक्कम जमा झाली तर ती रक्कम तुमची होऊ शकत नाही. या संदर्भात काही नियमावली बनवली आहे. जर तुमच्यासोबत कधी असे घडले तर त्या परिस्थितीत तुम्ही नक्की काय कराल? जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
जर तुमच्या खात्यात अनपेक्षित पैसे जमा झाले तर, लगेचच तुमच्या बँकेला संपर्क साधून या संदर्भात माहिती द्या. बँकेच्या ग्राहक संरक्षण केंद्राला संपर्क साधा अथवा, तुमच्या आजूबाजूला जवळ कुठे शाखा असेल तर तिथे जाऊन ही रक्कम कुठून आणि कशी आली या संदर्भात माहिती घ्या.
कधी कधी बँकेच्या चुकीमुळे खात्यात जास्तीचे पैसे जमा होतात. बँक त्वरित ते खाते गोठवते आणि चौकशी सुरू करते. खातेदाराने हे पैसे काढू नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाई होऊ शकते. बँक चुकीने जमा झालेले पैसे परत घेते. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच खात्यावरचे निर्बंध उठवले जातात. जर पैशाचा स्रोत अज्ञात राहिला, तर सरकारी एजन्सी तपास करतात.
जर तुमच्या खात्यात चुकून पैसे आले असतील तर ते काढणे बेकायदेशीर ठरू शकते. अशा प्रकरणांमध्ये भारतीय न्यायसंहिता (IPC) कलम 403 लागू होते. चुकीने जमा झालेले पैसे परत न केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.