Repo Rate: RBI ने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर ३ बँकांचा मोठा निर्णय! कर्जावरील व्याजदरात केली कपात

Bank Interest Rate Decreases: रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. रेपो रेट कपात झाल्यानंतर आता ३ राष्ट्रीय बँकांनी कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे.
Repo Rate
Repo RateSaam Tv
Published On

सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात करण्यात आली आहे. बेसिस पॉइंट्स कमी झाल्याने आता कर्जावरील व्याजदरात कपात होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर तीन राष्ट्रीय बँकांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या कर्जारील व्याजदरात कपात केली आहे.

बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक आणि पंजाब नॅशनल बँकेने आपल्या कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. यामुळे आता लोन घेणे स्वस्त होणार आहे. यामुळे कर्जाचा ईएमआयदेखील कमी होणार आहे.

Repo Rate
Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना कधीच मिळणार नाही १५०० रुपये; तुमचंही नाव आहे का? असं करा चेक

इंडियन बँकेत RBLR मध्ये कपात (Indian Bank)

इंडियन बँकेने ११ एप्रिलपासून RBLR मध्ये कपात केली आहे. बँकेने रेपो रेट ६.२५ वरुन ६.०० टक्के केली आहे. तर RBLR ९.०५ टक्क्यांवरुन ८.७० टक्के झाली आहे. यामुळे कर्जावरील व्याजदर कमी होणार आहे.

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank)

पंजाब नॅशनल बँकेने रेपो लिंक्ड लेंडिग रेट (RLLR) मध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात केली. यामध्ये बेसिस पॉइंट ९.१०वरुन ८.८५ टक्के झाले आहे. तर बँकेने एमसीएलआर आणि बेस रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda)

बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. यामध्ये कर्जावरील व्याजदरात ०.२५ टक्क्यांनी कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केल्यानंतर बँकेने हा निर्णय घेतला आहे.यामुळे होम लोन आणि पर्सनल लोनवरील व्याजदरात कपात केली आहे.

Repo Rate
Bank Jobs: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा ?

रेपो रेटचा परिणाम

रेपो रेटचा परिणाम हा कर्जाच्या व्याजदरावर होतो. रेपो रेट कमी झाल्यावर आपोआप व्याजदर कमी होते. रेपो रेटच्या आधारे बँका कर्जावरील व्याजदर ठरवतात. जर रेपो रेट कमी झाला तर व्याजदर कमी होते. जर रेपो रेट वाढला तर व्याजदर वाढते.

Repo Rate
RBI Cuts Repo Rate : तुमचा EMI किती कमी होणार, महिन्याला १००० ते ६००० रुपये वाचणार, गणित समजून घ्या!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com