HDFC बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा! होम लोन, कार लोन होणार स्वस्त

HDFC Bank Decreases MCLR Rate: एचडीएफसी बँकेने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. एचडीएफसी बँकेने एमसीएलआर रेट ०.१० टक्क्यांनी कमी केले आहे. यामुळे होम लोन, कार लोन स्वस्त होणार आहे.
 HDFC
HDFCSaam Tv
Published On

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनचा ईएमआय कमी होणार आहे. एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. एचडीएफसी बँकेने MCLR मध्ये कपात केली आहे. बँकेने MCLR म ०.१० टक्क्यांनी कपात केली आहे. याचा थेट परिणाम हा लोनवर होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या बैठकीपूर्वीच एचडीएफसी बँकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँकेने २०२५ च्या सुरुवातीलाच रेपो रेट कमी केला आहे. यामुळे कर्जाचा हप्ता कमी झाला आहे. यानंतर आता एप्रिल महिन्यात रिझर्व्ह बँकेची पुन्हा बैठक होणार आहे. यामध्ये रेपो रेट आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

 HDFC
Ladki Bahin Yojana: अक्षय तृतीयेला खुशखबर मिळणार,लाडक्या बहि‍णींच्या खात्यात खटाखट ₹१५०० जमा होणार?

MCLR म्हणजे काय?(What Is MCLR)

MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (Marginal Cost Of Funds Based Lending Rate). एमसीएलआर हे कर्जावरील व्याजदर निश्चित करण्यासाठी मदत करते. जर एमसीएलआर रेटमध्ये कपात झाली तर कर्जावरील व्याजदरातदखील कपात होईल. एचडीएफसी बँकेने हे नवीन एमसीएलआर रेट आजपासून लागू केले आहे. त्यामुळे जर तुम्ही घर खरेदी करायचा विचार करत असाल तर होम लोनवरील व्याजदर कमी होणार आहे.

एमसीएलआर रेट हे एका महिन्यासाठी एमसीएलआर (MCLR) ९.२० टक्के होते. त्यात ०.१० टक्क्यांनी कपात झाली आहे. म्हणजेच आता एमसीएलआर ९.१० टक्के असणार आहे.तीन महिन्याचा रेट ९.३० टक्के होता.तो कमी होऊन ९.२० टक्के झाला आहे. सहा महिने ते २ वर्षांचा रेट कमी होऊन ९.३० टक्के करण्यात आला आहे. हा रेट आधी ९.४० टक्के होता.

 HDFC
Bank Rules: तुमच्या खात्यात चुकून कोटी रुपये आले तर काय कराल? जाणून घ्या कायदा काय सांगतो

MCLR चा परिणाम

MCLR रेट बदलल्याने होम लोन, पर्सनल लोन, कार लोनच्या ईएमआयवर परिणाम होणार आहे. जर एमसीएलआर वाढवला तर कर्जावरील व्याजदर वाढते आणि कमी झाला तर कर्जाचे हप्ता कमी होतात. एमसीएलआर हा डिपॉझिट रेट, ऑपरेशनल कॉस्ट आणि कॅश रिजर्व्ह रेशो यावर आधारित असतो. यामुळे कर्जाचे हप्ता कमी होणार आहे.

 HDFC
Post Office Scheme: पोस्टाची भन्नाट योजना, फक्त व्याजातून कमवा २ लाख रुपये; मिळतोय जबरदस्त रिटर्न

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com