Police Officer Transfer: महाराष्ट्रातील ६ बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाला काय जबाबदारी मिळाली?

IPS Officer Transfer: राज्याच्या पोलिस प्रशासनात पुन्हा बदल झाले आहेत. राज्यातली ६ बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोणत्या आयपीएस अधिकाऱ्यावर आता काय जबाबदारी सोपवण्यात आली ते घ्या जाणून...
Police Officer Transfer: महाराष्ट्रातील ६ बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाला मिळाली काय जबाबदारी?
Police Officer Transfersaam Tv
Published On

फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून पोलिस प्रशासनामध्ये अनेक मोठे बदल होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून राज्यातील आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच आहे. आता राज्याच्या पोलिस प्रशासनात पुन्हा बदल झाले आहेत. राज्यातील ६ बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

मुंबई लोहमार्ग विभागाचे आयुक्त रवींद्र शिसवे यांची राज्याच्या गुप्त वार्ता विभागात सह आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. रवींद्र शिसवे यांच्यासह राज्यातील इतर सहा बड्या अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अमरावतीचे पोलिस आयुक्त एन डी रेड्डी यांचा देखील समावेश आहे. यासोबत, आयपीएस अधिकारी, शारदा वसंद निकम, सुप्रिया पाटील यादव, निसार तांबोळी, राजीव जैन आणि अभिषेक त्रिमुखे यांची देखील बदली करण्यात आली आहे.

Police Officer Transfer: महाराष्ट्रातील ६ बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाला मिळाली काय जबाबदारी?
Success Story: IPS होऊनच दाखवलं! मेंढपाळाच्या मुलाने जिद्दीने क्रॅक केली UPSC; मेंढ्या चरत कुटुंबियांसोबत केला आनंद साजरा

अमरावतीचे पोलिस आयुक्त एन डी रेड्डी यांची नागपूर येथे सह पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. निकम शारदा वसंत यांची अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली. सुप्रिया पाटील यादव यांची विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) या ठिकाणी बदली करण्यात आली.

Police Officer Transfer: महाराष्ट्रातील ६ बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाला मिळाली काय जबाबदारी?
Birdev Done IPS: आमचा बिरदेव साहेब झाला... मेंढपाळाच्या पोरानं UPSC ची तयारी कशी केली?

तर, निसार तांबोळी यांची राज्य राखीव पोलिस बल नागपूर येथे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली. राजीव जैन यांची सागरी विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली. तर अभिषेक त्रिमुखे यांची विशेष पोलिस महानिरीक्षक (प्रशासन) म्हणून बदली करण्यात आली आहे.

Police Officer Transfer: महाराष्ट्रातील ६ बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाला मिळाली काय जबाबदारी?
Success Story: दोन सरकारी नोकऱ्या रिजेक्ट केल्या, २०१७ पासून तयारी, शेवटी बीरदेव IPS झाला!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com