
रणजीत माजगावकर, साम टीव्ही प्रतिनिधी
प्रचंड जिद्द, प्रयत्नांची पराकाष्टा आणि चिकाटीच्या जोरावर कागल तालुक्यातील यमगे येथील बिरदेव सिद्धाप्पा डोणे या युवकाने केंदीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होवून आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न सत्यात उतरवले. त्याचा आनंद कुटूंबासमवेत बेळगाव जिल्ह्यात मेंढरं राखत साजरा केला.
सध्या बिरदेव हा बेळगाव जिल्हयातील खानापूर परिसरात आहे. आपण आयपीएस उत्तीर्ण होणार याची खात्री होती. त्यामुळे परत मेंढरामध्ये जाता येणार नाही म्हणून तो चार दिवसापूर्वीच कर्नाटकात गेला आहे. एका मेंढपाळाच्या मुलग्याने अवघ्या २७ व्या वर्षी उच्चपदस्थ अधिकारी पदावर मोहर उमटवली आहे.
केंद्रशासनाने २०२४ मध्ये घेतलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहिर झाला. त्यामध्ये बिरदेव उत्तीर्ण झाल्याचे समजताच त्याच्या जन्मगावी यमगे येथे बिरदेवच्या अनुपस्थितीत त्या मित्र परिवाराने जल्लोष केला. यमगे येथे त्याचे जल्लोषी स्वागत करण्यात येणार असून त्यासाठी ची तयारी सुरु झाली आहे.
बिरदेवचे प्राथमिक शिक्षण यमगेच्या विद्यामंदीर या शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण जयमहाराष्ट्र हायस्कूल यमगे येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण त्याने मुरगूडच्या शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये घेतले. इंजिनिअरिंगची पदवी पुण्याच्या सीओईपी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेतली.
स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाठी त्याने थेट देशाची राजधानी गाठली. बिरदेवने दिल्लीमध्ये आयपीएस (IPS)परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीचे क्लास सुरु ठेवले. याठिकाणी त्याने दिवसातील २४ तासामधील सर्वाधिक वेळ त्याने अभ्यास करण्यात खर्ची घातला. काहीही झाले तरी आयपीएस व्हायचेचं हे ध्येय डोळ्यासमोर ठेवलेल्या बिरदेवने यशाला गवसणी घातली.
बिरदेव दिल्लीत यूपीएससीचा (UPSC)अभ्यास करत होता. महिन्याला दहा-बारा हजार रुपये त्याला खर्चासाठी पाठवणे वडिलांना कठीण होत चालले होते. त्यामुळे हा नाद सोड आणि एखादी नोकरी कर असा तगादा वडिलांनी बिरदेवकडे लावला होता. मात्र आपण आयपीएस परीक्षेत यशस्वी होणारच ही जिद्द बिरदेवने बोलून दाखवली होती. आज ते खरे ठरले. त्यामुळे कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.