
देशातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत अनेक जणांनी यश मिळवले आहे. नांदेड शहरातील कौठा येथील एका लाँड्रीचालकाच्या डॉक्टर मुलाने नागरी सेवेत यश मिळवलं आहे. त्याने आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं सोन केलं आहे.
डॉ. शिवराज राजेश गंगावळ अस या तरुणाचं नाव असून एमबीबीएस (MBBS) करून यूपीएसीच्या माध्यमातून त्याने हे यश संपादन केले आहे. शिवराज गंगावळ यांचे वडील राजेश गंगावळ हे लाँड्रीचा व्यवसाय करायचे. हालकीच्या परिस्थितीत त्यांनी तिन्ही मुलांना शिकवले. मुलांच्या शिक्षणासाठी राजेश गंगावळ हे अथक प्रयत्न करायचे. त्यांच्या या कष्टाचं चीज करत शिवराज यांनी एमबीबीएसच शिक्षण पूर्ण केले.
डॉ.शिवराज यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण नांदेड शहरातील प्रतिभानिकेतन हायस्कूल, बारावीचे शिक्षण यशवंत महाविद्यालयातून तर वैद्यकीय शिक्षण कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण झाले. डॉ. शिवराज गंगावळ हे सध्या मुखेड तालुक्यातील बारहाळी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
वैद्यकीय अधिकारी असताना देखील मोठं अधिकारी बनण्याच स्वप्न होतं. त्यानुसार त्यांनी युपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी सुरु केली, पण पाच वेळा अपयश आलं, तरी ही खचून न जाता प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर सहाव्यांदा शिवराज यांने यूपीएससीत यश प्राप्त करून दाखविले. शिवराजच्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होतं आहे.
जिद्द आणि मेहनतीचे स्वप्न साकार करता येतं हे शिवराजने सिद्ध करून दाखवले आले.कुठलंही ध्येय गाठताना हार्डवर्क बरोबर स्मार्टवर्क देखील करणं गरजेचं आहे.अंगी आत्मविश्वास ठेवला तर यश हे नक्की मिळते असा संदेश डॉ. शिवराज गंगावळ यांनी इतरांना दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.