Success Story: भाड्याच्या घरात आयुष्य गेलं, दिवसरात्र मेहनत करुन क्रॅक केली UPSC; IAS अंजली अजय यांना प्रवास

Success Story of IAS Thakur Anjali Ajay: आयएएस ठाकूर अंजली अजय यांनी यूपीएससी परीक्षेत ४६ रँक मिळवली आहे. आर्थिक परिस्थिती बेताची, भाड्याच्या घरात राहून त्यांनी अभ्यास केला आणि हे यश मिळवले.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यशाचे उंच शिखर गाठण्यासाठी फक्त मेहनत आणि इच्छाशक्ती महत्त्वाची असते. जर तुमच्यात मेहनत करायची ताकद असेल तर यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. असंच काहीसं ठाकूर अंजली अजय यांच्यासोबत झालं. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही आयएएस (IAS) होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण केले.

Success Story
Success Story: कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; २२ व्या वर्षी IAS झालेले अरुणराज आहेत तरी कोण?

ठाकुर अंजली अजय यांनी २०२३ मध्ये यूपीएससी (UPSC Exam) परीक्षा क्रॅक केली. त्यांनी फक्त परीक्षाच क्रॅक केली नाह तर ४३वी रँकदेखील मिळवली. त्यांनी खूप कमी वयात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.

अंजली या मूळच्या बिहारच्या. परंतु त्यांचे कुटुंब सूरत येथे राहत होते. त्या लहानपणापासूनच हुशार होत्या. त्यांना अभ्यासाची आवड होती. त्यांचे वडील एलआयसी एजंट होते. अंजली यांच्या वडिलांनी लहानपणीच त्यांनी आवड ओळखली होती. त्यांना समाजसेवा करण्याची आवड होती. त्यामुळेच त्यांनी आयएएस होण्याचे ठरवले.

अंजली या भाड्याच्या घरात राहायच्या. आर्थिक परिस्थिती फार काही बरी नव्हती. अंजली यांचे शिक्षण सरकारी शाळेतून झाले. त्यानंतर त्यांनी नालागढ येथील गवर्नमेंट पोस्ट ग्रॅज्युएशन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्यांनी तयारीदेखील सुरु केली.

अंजली यांना या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांना फक्त यूपीएससी परीक्षा पास करायची नव्हती तर चांगली रँक मिळवून कलेक्टर बनायचे होते. त्यांनी यासाठी खूप प्रयत्न केले. जोपर्यंत आयएएस होणार नाही तोपर्यंत यूपीएससी परीक्षा देईन, असं त्यांनी ठरवलं होतं.

Success Story
Success Story: वडिलांची अपूर्ण इच्छा मुलीनं केली पूर्ण, कल्याणची स्नेहा न्यायाधीश झाली; वाचा यशाची कहाणी

२०२१ मध्ये त्यांनी प्रिलियम्स आणि मेन्स परीक्षा पास केली होती. परंतु त्यांना इंटरव्ह्यूमध्ये यश मिळाले नाही. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी २०२२ मध्ये परीक्षा दिली. परंतु यावेळी मिळालेल्या रँकने त्या खूश नव्हत्या. त्यामुळे त्यांनी २०२३ मध्ये पुन्हा यूपीएससी (UPSC) परीक्षा दिली.

भाड्याच्या घरात राहून आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंजली यांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी दिवसरात्र एक करुन अभ्यास केला. त्यांना या मेहनतीला यश मिळाले आणि त्या आयएएस झाल्या.

Success Story
Success Story: वडिलांचा ब्रेन ट्युमर लेकाच्या डोक्यात गेला; PHD केली अन् कॅन्सरवर औषध शोधलं ; २ पेटंट मिळाले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com