Success Story: वडिलांचा ब्रेन ट्युमर लेकाच्या डोक्यात गेला; PHD केली अन् कॅन्सरवर औषध शोधलं ; २ पेटंट मिळाले

Success Story Of Nagpur Boy: नागपूरच्या एका तरुणाने एक संशोधन केले आहे. यामध्ये ब्रेन ट्युमरवर मात करण्यासाठी नोझल स्प्रेमध्ये जनॅनोपार्टिकल्स थेट मेंदूपर्यंत जाऊन उपचार करणार आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

गरज ही शोधाची जननी असं म्हटलं जातं.अशाच वडिलांना ब्रेन ट्युमर झालेल्या दुःखद प्रसंगातून सावरत थेट ट्युमरवर पोहचेल असं औषध शोधलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात फार्मसी विभागात पीएचडी करणारा विद्यार्थी आणि प्राध्यापकासोबत मिळून संशोधन यशस्वी करत पेटंट मिळवलंय. त्यामुळे ब्रेनट्यूमरवर उपचार म्हणून नोझल स्प्रेमध्ये जनॅनोपार्टिकल्स थेट मेंदूपर्यंत जाऊन उपचार करणार आहे.

Success Story
Success Story: विराट कोहलीकडून प्रेरणा, कधीही न हारण्याची जिद्द, पहिल्याच प्रयत्नात तिसरी रँक, वाचा IAS अनन्या रेड्डी यांचा प्रवास

नागपुरातील सागर त्रिवेदी 2019 मध्ये एमफार्म पूर्ण केलं.पीएचडी करण्याचा तयारीत असतांना. सागरच्या वडिलांना ब्रेन ट्युमर झालं.त्यानंतर आर्थिक आणि मानसिक त्रासातून जाताना यावर औषध शोधण्यासाठी काम सुरू केलं. यासाठी सागरने विद्यापीठाचा फार्मसी विभागाच्या विना बेलगमवार यांच्यासोबत संशोधनाला सुरवात केली.. प्राध्यापक विमा बेलगमवार यांचा आगोदरच अभ्यास सुरू होता. यात आणखी प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी मिळून काम केलं. तब्बल चार वर्षानंतर या प्रयोगात यश आलं त्याला दोन पेटंट सुद्धा मिळाले आहे. यावर आतापर्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचे 12 संशोधन पेपर व पाच बुक चाप्टर प्रसिद्ध झाले आहे.

Success Story
Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही क्लासशिवाय पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक ; २२ व्या वर्षी IAS झालेल्या अनन्या सिंह आहेत तरी कोण?

या संशोधनात प्राण्यांवर उपचार करताना यश मिळाला आहे. मात्र यात सर्वात मोठी चाचणी ही मानवी ट्रायलसाठी ठरणार आहे. त्यामुळे यावर मानवी ट्रायल होऊन हे औषध बाजारात येण्यापर्यंतची प्रक्रिया महत्त्वाची असणार आहे. त्यासाठी आता पुढील प्रयत्न सुरू असल्याचाही प्राध्यापक विना बेलगमवार यांनी सांगितले.

Success Story
Success Story: वडिलांचे छत्र हरपले, आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिली UPSC; कोणत्याही क्लासशिवाय मिळवली दुसरी रँक; IAS गरिमा लोहिया यांचा प्रवास

उपचाराची पद्धत आणि त्याचे फायदे

- कॅन्सर ग्रस्त रुग्णांना उपचार पद्धती म्हणून एक म्हणजे यामध्ये सर्जरी, दुसरा किमो हे सलाईन द्वारे इंजेक्शन देऊन केली जाते. याचे कॅन्सर असणाऱ्या भागासह शरीरातील गंभीर परिणाम होतात. यासह त्रासातून जावं लागतं.

- विशेष म्हणजे यामध्ये "नोवेल टारगेटेड ट्रक डिलिव्हरी सिस्टीम" या उपचार पद्धतीच्या माध्यमातून एका स्प्रे द्वारे ज्ञानू पार्टिकल्स च्या माध्यमातून मेंदूत असणाऱ्या ट्यूमरपर्यंतच्या गाठी पर्यंत पोहचता येणार आहे.

- यामध्ये औषध देताना रक्ताचा अडथळा येणार नाही आणि जास्तीत जास्त प्रमाणात प्रभावीपणे औषध पोहोचून त्या गाठीवर उपचार होईल अशी उपचार पद्धत असणार आहे.

- विशेष म्हणजे हा उपचार घेताना नाकाद्वारे स्प्रे करून देता येणार. यासाठी रुग्णाला दवाखान्यात भरती राहण्याची गरज कमी असेल.. शिवाय रुग्णांना लवकर प्रभावी उपचार होईल आणि कॅन्सर ग्रस्त रुग्ण म्हणून आयुष्य वाढण्यातही मदत मिळेल.

- हे औषध बनवताना लागणार औषध हे बायो ऍक्टिव्ह हे मशरूम आणि काळे यापासून बायो ऍक्टिव्ह घेतले आहे म्हणजेच नैसर्गिक स्त्रोतांपासून मिळाले असल्यामुळे ते सहज उपलब्ध होणार आहे.

- नॅनो पार्टीकल पध्दतीमुळे मेंदूसाठी दुसरे वेगवेगळ्या आजारावर ड्रॅग थेट मेंदूपर्यंत पाठवण्यासाठी सुद्धा "नोवेल टारगेटेड ट्रक डिलिव्हरी सिस्टीम" मदतगार ठरू शकते.

Success Story
Success Story: दोस्ती असावी तर अशी! एकत्र अभ्यास, एकत्र वकिली, आता तिघेही न्यायाधीश, शिरुरच्या ३ मित्रांची यशोगाथा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com