Pune Fire News : मोठी बातमी! पुण्यातील लाकडी वाड्याला भीषण आग, विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

Pune Wooden House Fire : पुण्यातील लाकडी वाड्याला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Pune Nana Peth wooden house Fire
Pune Nana Peth wooden house FireSaam Tv News
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : पुण्यातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे, शहरातील नाना पेठेतील राम मंदिराशेजारील लाकडी वाड्याला भीषण आग लागल्याची घटना काही वेळापूर्वी घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती समजू शकलेलं नाहीय.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील पारेख वाड्याला रविवारी रात्री 8 वाजून ८ मिनिटाला आग लागल्याची माहिती मिळताच दलाकडून तातडीने फायरगाड्या रवाना झाल्या. घटनास्थळी पोहोचल्यावर जवानांनी तीन मजली लाकडी जुन्या वाड्याला आग भीषण लागल्याचे बघताच अतिरिक्त मदत मागवली. अग्निशमन दलाकडून एकूण 10 फायरगाड्या, 4 वॉटर टँकर, 2 देवदूत वाहने आणि व्हेईकल डेपोकडून पाच वॉटर टँकर रवाना करण्यात आले.

Pune Nana Peth wooden house Fire
Maharashtra unseasonal rain : राज्याला अवकळी पावसाने झोडपलं; उभी पिकं झाली आडवी, कुठे-कुठे पाऊस बरसला?

जवानांनी वाड्याच्या तीन ही बाजूच्या रस्त्याला अग्निशमन वाहने उभी करुन पाण्याचा मारा केला. पाण्याचा मारात करत आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला. वाड्यात कोणी राहत नसल्याची खातरजमा केली. धूर मोठ्या प्रमाणात असल्याने शेजारी असलेल्या रहिवाशी इमारतीमधून सर्व रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविलं. घरामधील सिलिंडर बाहेर घेत मोठा धोका टाळला. त्याचबरोबर आग इतरत्र पसरणार नाही, याची दक्षता घेतली. त्यानंतर तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवत कुलिंग ऑपरेशन सुरु ठेवलं.

Pune Nana Peth wooden house Fire
Shah Rukh Khan : ५ सिनेमा, ३४०० कोटी रुपयांची कमाई; शाहरुख खानला कोणत्या सिनेमाने केले मालामाल? वाचा

सदर ठिकाणी पूर्ण बाजारपेठेचा परिसर असून रस्त्याचे काम सुरु आहे. रस्ता अरुंद आणि काम सुरु असल्याने अग्निशमन वाहने जाण्यास अडथळा निर्माण झाल्याचं दिसून आलं. अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी आगीच्या ठिकाणी उपस्थित राहून अग्निशमन दलाचे जवळपास पाच अधिकारी आणि किमान साठ ते सत्तर जवानांना मार्गदर्शन करत आहेत. या घटनेत कोणी मृत किंवा जखमी झालेले नाही. तसेच या आगीचे कारण आत्ता तरी समजू शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com