
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा चाहता वर्ग कोट्यवधींच्या संख्येत आहे. याच शाहरुख खानने त्याच्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिकेतून केली. त्यानंतर १९९२ साली बॉलिवूड इंडस्ट्रीत करिअरला सुरुवात केली. शाहरुख खान आजतागायत म्हणजे तब्बल ३३ वर्षांपासून कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे. शाहरुख खानने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. शाहरुखच्या ५ सिनेमांमधून सर्वाधिक कमाई केली. त्याच्या दोन सिनेमाने वर्ल्डवाइड १००० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमाने सर्वाधिक कमाई केली. 'जवान' सिनेमा ७ सप्टेंबर २०२३ रोजी रिलीज झाला होता. दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील दिग्दर्शक एटली कुमार यांनी 'जवान' सिनेमाचं दिग्दर्शन केलं. शाहरुखच्या या सिनेमाने जगभरात ११५० कोटींची कमाई केली. जवान 'ऑल टाइम ब्लॉकबस्टर' सिनेमा ठरला.
जवानच्या आधी २०२३ साली 'पठाण' सिनेमा रिलीज झाला होता. पठाण सिनेमात शाहरुखसोबत जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण या स्टारने प्रमुख भूमिका साकारली होती. 'पठाण' शाहरुखचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. 'पठाण' सिनेमाने १०५० कोटींहून अधिक कमाई केली. 'पठाण' सिनेमा देखील 'ऑल टाइम ब्लॉकबस्टर' ठरला.
शाहरुखने 'पठाण' आणि जवान सिनेमानंतर 'डंकी'च्या माध्यमातून चाहत्यांची मने जिंकली. डंकी सिनेमा देखील २०२३ सालीच रिलीज झाला होता. राजकुमार हिरानी यांनी 'डंकी' सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. राजकुमार आणि शाहरुखच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. २१ डिसेंबर २०२३ सोली डंकी सिनेमा रिलीज झाला होता. 'डंकी' सिनेमाने ४५४ कोटींची कमाई करून बॉक्स ऑफिसवर धमाल केली होती.
शाहरुख खानचा 'चेन्नई एक्स्प्रेस' चाहत्यांना चांगलाच भावला. शाहरुख खानच्या २०१३ साली रिलीज झालेल्या सिनेमात दीपिका पदुकाणने लीड रोल केला होता. 'चेन्नई एक्स्प्रेस' सिनेमाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीने केलं होतं. या सिनेमाने जगभरात ४२२ कोटींची कमाई केली होती.
'हॅप्पी न्यू ईयर' हा सिनेमा मल्टीस्टारर सिनेमा आहे. या सिनेमामध्ये शाहरुख खान, सोनू सुद, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, दीपिका पदुकोण आणि विवान शहाने प्रमुख भूमिका निभावल्या आहेत. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३९७ कोटींची कमाई केली होती. 'हॅप्पी न्यू ईयर' हा पाचवा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.