Fact Check : लाखाचं सोनं 55 हजारात मिळणार? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? वाचा सविस्तर

gold price Fall fact check : सोनं प्रतितोळा 55 हजारांना मिळणाराय...होय, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल...पण, हे खरं असल्याचा दावा करण्यात आलाय. या दाव्यामुळे एकच खळबळ उडालीय...मात्र, या दाव्यात तथ्य आहे का...? खरंच सोनं 55 हजार प्रति तोळा होणार आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
Gold Price
Today's Gold Pricesaam tv
Published On

सोनं आता 55 हजारांवर येणार आहे...90 हजार पार झालेलं सोनं आता 55 ते 56 हजारांवर येणार असल्याचा दावा करण्यात आलाय...या दाव्यामुळे आता ग्राहकांमध्ये प्रचंड खळबळ उडालीय...खरंच सोनं गडगडणार आहे का...? सोनं उतरणार असेल तर आपल्याकडील सोनं विकावं की तसंच ठेवावं असा संभ्रम निर्माण झालाय...

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या वाढता आलेख पाहता, ग्राहकही हैराण झालेयत. कारण, सोन्याचा दरच एवढा वाढतोय त्यामुळे सामान्यांना परवडेना झालंय...मात्र, आता सगळ्यांनाच सोनं घेणं शक्य होणाराय...कारण, 55 हजारांवर सोनं येणार असल्याचा दावा करण्यात आलाय...अमेरिकेतील मॉर्निंगस्टारचे रणनितीकार जॉन मिल्स यांच्या अंदाजानुसार सोन्याच्या किमतीत 38 टक्क्यांपर्यंत घसरण होण्याची शक्यता वर्तवलीय.

Gold Price
Success Story : ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र अभ्यास, अडीअडचणीला साथ; आता तिघे मित्र एकत्र झाले न्यायाधीश

जॉन मिल्स यांच्या अंदाजानुसार

देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार रुपये

जागतिक बाजारात त्याची किंमत $3,100 पेक्षा जास्त

सुमारे 38 टक्क्यांनी सोन्याचे दर घसरू शकतात

आगामी काळात भारतीय बाजारपेठेत 55 हजार रुपयांवर सोनं पोहोचू शकतं

Gold Price
bacchu kadu : बच्चू कडू पुन्हा मैदानात, विधानपरिषदेसाठी नवा डाव; शिक्षक मतदारसंघातूनही निवडणूक लढण्याचे संकेत

हा दावा ग्राहकांसाठी दिलासादायक आहे...मात्र, या दाव्यात तथ्य असू शकतं का...? कारण, सोनं घेणाऱ्यांची संख्या देशभरात मोठी आहे...त्यामुळे सत्य जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने एक्सपर्टची भेट घेतली...त्यांना व्हायरल व्हिडिओ आणि ही पोस्ट दाखवली...त्यावेळी त्यांनी काय मत व्यक्त केलं पाहुयात.

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य काय?

सोन्याचे दर घसरणार यात काही बेस नाही

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 140 डॉलरने खाली आलं

अमेरिका 5 टक्के सोन्याचा साठा विकेल अशी चर्चा

अमेरिकेकडून अधिकृतपणे सांगितलेलं नाही

सोन्याचा पुरवठा कमी होण्याची शक्यता अधिक

पुरवठा कमी झाल्याने सोन्याचे भाव कमी होणार नाही

Gold Price
Nashik Accident : शिर्डीला जाताना मुंबईतील साईभक्तांच्या बसचा अपघात; वाहनाचा अक्षरश: चक्काचूर, थरारक अपघाताचे PHOTO

अमेरिकेने सुरू केलेलं ट्रेड वॉर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धाची परिस्थिती ⁠यामुळे देखील सोन्याचे दर वाढतीलच ते कमी होणार नाहीत...असं तज्ज्ञांचं मत आहे...त्यामुळे आमच्या पडताळणीत सोनं 55 हजारांवर येणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com