bacchu kadu : बच्चू कडू पुन्हा मैदानात, विधानपरिषदेसाठी नवा डाव; शिक्षक मतदारसंघातूनही निवडणूक लढण्याचे संकेत

bacchu kadu Latest News : बच्चू कडू पुन्हा मैदानात उतरणार आहे. कडू विधानपरिषदेसाठी नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. शिक्षक मतदारसंघातूनही निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत.
bacchu kadu News
bacchu kadu Saam tv
Published On

अमर घटारे, साम टीव्ही

विधानसभेचा आखाडा गाजवणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी विधानपरिषदेच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरु केल्याची माहिती मिळत आहे. बच्चू कडू अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात निवडणूक ही २०२६ मध्ये होणार आहे.

यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांचा अचलपूर मतदारसंघातून पराभव झाला. विधानसभेतील पराभवानंतर बच्चू कडू यांनी शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. याआधी बच्चू कडू यांनी अचलपूर विधानसभा मतदारसंघातून २००४, २००९, २०१४ आणि २०१९ अशा एकूण ४ वेळा विजय मिळवला होता. यंदा भाजपच्या प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांचा १२,१३१ मतांनी पराभव केला.

bacchu kadu News
Leopard Attack : कोंबडीचोर बिबट्या, रात्रीच्या अंधारात दबक्या पावलांनी आला अन्...CCTV व्हिडिओ बघा

बच्चू कडू पुन्हा मैदानात

बच्चू कडू हे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात सक्रिय झाल्याने पुढील वर्षी होणारी निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे शिक्षक मतदारसंघ किंवा विधान परिषद निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे. बच्चू कडू यांनी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून किंवा विधान परिषद निवडणूक लढण्याचे महत्वाचे संकेत दिले आहेत.

bacchu kadu News
Badlapur Crime : बदलापुरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; तरुणाकडून आधी अल्पवयीन मुलीचा पाठलाग, नंतर हात पकडला अन्

सध्या शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे. तर भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या जागेवर सुद्धा बच्चू कडू निवडणूक लढण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बच्चू कडू यांची प्रहार शिक्षक संघटनेच्या शिक्षकांसोबत संवाद बैठक आयोजित केली होती. दुसरीकडे आगामी महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी बच्चू कडूंची फिल्डिंग सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com