
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्याला घेऊन जाणाऱ्या लिमोझिन कारवर हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतीन हेच लक्ष्य होते का? असा प्रश्न केला जातोय. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनीही पुतीन यांच्या मृत्यू बाबत विधान केलं होतं. मॉस्कोमध्ये एका आलिशान ऑरस लिमोझिन कारमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर कारला आग लागली.
द सनच्या रिपोर्टनुसार व्लादिमीर पुतिन यांनी या स्फोटानंतर सक्त शोधमोहीम सुरू करण्याचे आदेश दिलेत. या आगीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रशियन संरक्षण संस्था असलेल्या एफएसबीच्या मुख्यालयाजवळ हा स्फोट झाला. ही कार व्लादिमीर पुतिन यांची असल्याचा दावा केला जातोय.
कारला आग लागल्याचे पाहून आजूबाजूचे लोक तातडीने मदतीसाठी धावले. हल्ला झालेल्या कारची किंमत 275,000 पौंड आहे. लिमोझिन कारला आग लागल्याचा व्हिडिओही ऑनलाइन व्हायरल होतोय. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये पाहू शकतो की, आगीने इंजिनला वेढलं. त्यानंतर गाडीच्या संपूर्ण आतील भागात आग पसरली. या कारची देखरेख राष्ट्रपती इस्टेट विभागाकडून केले जाते, जे राष्ट्रपतींच्या वाहतुकीची काळजी घेतली जाते. स्फोट झाला तेव्हा कारमध्ये कोणी होते की नाही हे अद्याप समजू शकलेले नाहीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.