Maharashtra unseasonal rain : राज्याला अवकळी पावसाने झोडपलं; उभी पिकं झाली आडवी, कुठे-कुठे पाऊस बरसला?

Maharashtra unseasonal rain update : राज्यातील विविध भागांना अवकळी पावसाने झोडपलं आहे. या पावसामुळे उभी पिकं आडवी झाली आहे.
Maharashtra unseasonal rain
rain update Saam tv
Published On

राज्याला अवकाळी पावसाने झोडपणे सुरुच आहे. अचानक बरसलेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. सोलापूर, कोकण भागात कोसळलेल्या पावसामुळे पेरू, आंबा फळांचं नुकसान झालं आहे. पावसानंतर काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला आहे.

सांगोल्याला पावसाचा फटका

सोलापुरातील सांगोला तालुक्यातील अनेक गावांना वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा फटका बसलाय. यात पेरु, आंबा या फळांच मोठं नुकसान झालंय. तसचं दिनकर पवार या शेतकऱ्याचं पॉली हाऊस जमिनदोस्त झालंय.

Maharashtra unseasonal rain
BJP Politics : भाजपचा काँग्रेस होऊ देऊ नका; पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं काय घडलं?

सावंतवाडीत चक्रीवादळासह मुसळधार पाऊस

सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहर आणि परिसराला चक्रीवादळासह मुसळधार पावसाने झोडपून काढलंय..तब्बल दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडली. काही वेळासाठी वीजपुरवठा खंडित झाला होता. मुसळधार पावसाचा केळी आणि काजू पिकाला फटका बसलाय.

Maharashtra unseasonal rain
Ujjain Train Fire : मोठी बातमी! धावत्या एक्स्प्रेसला आग, प्रवाशांमध्ये उडाली एकच खळबळ

वातावरणाचा पिकांना फटका

मुरूड परिसरात ढगाळ वातावरणाचा फटका आंबा पिकावर बसलाय. आंब्यावर फळाची वाढ पूर्ण होण्यापुर्वीच करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला

महाडमध्ये अवकाळी पाऊस

रायगडच्या महाडमध्ये अवकाळी पाऊस झाला. तसेच बस स्थानकात पाणीच पाणी पाहायला मिळालंय. महाड ST स्थानकात रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच काम सुरूय. यामुळे उंच सखल भाग निर्माण झाले असून पावसानंतर बस स्थानकातील कंट्रोल केबीन समोर पाणी साचले

Maharashtra unseasonal rain
Taj Mahal : ताजमहल वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी? प्रेमाच्या प्रतिकावर कोणाचा मालकी हक्क? वाचा सविस्तर

बोटींना बदंरात येणे बंधनकारक

बदलत्या हवामान आणि एकवीरा देवीच्या उत्सवामुळे मोठ्या प्रमाणात मासेमारी बोटी किनाऱ्यावर लागल्यात.. हवामान खात्याकडून देण्यात आलेला यलो अलर्ट पाहता बोटींना बंदरात येणे बंधनकारक आहे...

खराब हवामानामुळे मासेमारी कठीण

खराब हवामानामुळे सुरक्षेसाठी मच्छिमार बांधवांनी आपल्या नौका किनारी नांगरुन ठेवल्यायत. पुढील 2 दिवस वादळी वाऱ्याचा इशारा असल्यानं काळजी घेतली जातेय. आठवडाभर वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळलाय. त्यामुळे मासे मिळणंही कठीण झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com