
छत्तीसगडच्या बिलासपूरहून राजस्थानच्या बिकानेरमध्ये जाणाऱ्या बिलासपूर-बिकानेर एक्स्प्रेस ट्रेनला रविवारी आग लागल्याची घटना घडली. बघता बघता आगीचे लोट हवेत पसरू लागले. धावत्या ट्रेनला आग लागल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. धावत्या ट्रेनला आग लागल्याचे दिसताच गार्डने एक्स्प्रेसला उज्जैनजवळ थांबवली. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी ज्या कोचला आग लागली, तो कोच वेगळा केला.
एक्स्प्रेसच्या जनरेटर कोचला आग लागली. या आगीत कोणत्याही प्रकारची वित्तहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. या घटनेनंतर रेल्वेने चौकशीचे आदेश दिले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही आग एसएलआर बोगीला लागली. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी उज्जैनपासून जवळपास ५० किलोमीटर अंतरावर काली सिंध ब्रिजहून जाताना बिलासपूर-बिकानेर एक्स्प्रेसच्या एसएलआर डब्याला अचानक आग लागली.
गार्डची नजर ट्रेनला लागलेल्या आगीवर पडली. त्यानंतर गार्डने ट्रेनच्या मोटरमनला फोन करून गाडी थांबवली. पुढे रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. त्यानंतर तराना स्टेशनवर आग लागलेल्या एसएलआर कोचला बाजूला काढलं आणि ट्रेन पुढे रवाना केली. रेल्वे अधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. रेल्वे पीआरओ खेमराज मीणा यांच्या माहितीनुसार, कोचला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळण्यात यश आलं आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही'.
ट्रेन तराना येथे रोखून आग लागलेला डबा वेगळा केला. त्यानंतर ट्रेन पुढे रवाना केली. रेल्वे अधिकाऱ्यांनी आग कशी लागली, याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची संशय व्यक्त केला जात आहे. ट्रेनला आग लागल्याच्या घनटेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, 'कोचला लागलेल्या आगीचे लोट हवेत पसरत आहेत'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.