Karjat Railway Station : पहिला घास खाताच संशय आला, बघितल्यानंतर वडापावमध्ये आढळला साबणाचा तुकडा; रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक प्रकार

Karjat Railway Station update : कर्जत रेल्वे स्टेशनवरील एका स्टॉलवर वडापावमध्ये साबणाचा तुकडा आढळल्याची घटना घडली आहे. रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार घडला आहे.
Karjat
Karjat Railway Station saam tv
Published On

कर्जत : सर्वसामान्यांचा नाष्टा म्हणून ओळख असलेल्या वडापावमध्ये साबणाचा तुकडा आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत रेल्वे स्थानकावर ही धक्कादायक घटना आहे. एका महिला प्रवाशासोबत हा प्रकार घडला आहे. वडापावात साबणाचा तुकडा आढळण्याच्या घटनेने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Karjat
Pune Crime : पुणे हादरलं! अनैतिक संबंधात अडसर; बायकोने डाव रचला अन् नवरा पलंगावर झोपलेला असतानाच...

कर्जत रेल्वे स्थानकावर मंगळवारी रात्री उशिरा कर्जत रेल्वे स्थानकावर एका महिला प्रवाशाने वडापाव घेतला. यामध्ये चक्क साबणाचा तुकडा आढळला. वडापावमध्ये साबण आढळल्याच्या हा प्रकार समोर आल्यानंतर प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कर्जत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर २ वर असलेल्या बी. के. जैन या खाद्यपदार्थ विक्री स्टॉलमधून हा वडापाव घेतला होता.

Karjat
Maharashtra Rain : राज्यावर संकट! अवकाळी पावसाने झोडपलं, उन्हाळी पिकांना मोठा फटका; बळीराजाला रडवलं

पहिला घास घेताच त्यांना त्यामध्ये काहीतरी वेगळा घटक असल्याचा संशय आला. बघितल्यानंतर केल्यावर त्यांना वडापावमध्ये साबणाचा तुकडा आढळला. या घटनेची गंभीर दखल घेत कर्जत रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक प्रभास कुमार लाल यांनी सदर स्टॉल तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

Karjat
Navi Mumbai : ५ मजली अनधिकृत इमारत, ९० छोटे फ्लॅट; सिडकोने थेट जेसीबी फिरवला, शेकडो बेघर

जेवणात आढळल्या अळ्या

बुलढाण्यात काही दिवसांपूर्वी शिवभोजन केंद्रातील जेवणात अळ्या आढळल्याची घटना घडली होती. खामगाव शहरातील शासकीय रुग्णालयाजवळील शिव भोजन केंद्रात हा प्रकार घडला होता. जेवणात अळ्या आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नागरिकांनी घेतलेल्या जेवणामध्ये अक्षरशा अळ्यांचा थर आढळल्याने जेवणाच्या दर्जाबाबत संताप व्यक्त केला जात आहे. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com