Maharashtra Rain : राज्यावर संकट! अवकाळी पावसाने झोडपलं, उन्हाळी पिकांना मोठा फटका; बळीराजाला रडवलं

Maharashtra Rain update : राज्यावर अवकाळी पावसाचं संकट आलं आहे. राज्याला अवकाळी पावसामुळे झोडपलं आहे. उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला आहे.
Maharashtra Rain update
Maharashtra Rain Saam tv
Published On

मुंबई : राज्याला ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने झोडपलं आहे. राज्यातील विविध भागात कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गारपिटीसह बरसलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. वर्धा, नंदूरबार, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला.

वर्ध्यात अवकाळी पावसाची हजेरी

वर्धा शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वर्ध्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर दुपारी वादळी वाऱ्यांसह पाऊस बरसला. हवामान विभागाने पुढील 24 तासांत वर्धा जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला होता. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे उन्हाळी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

नंदुरबारला अवकाळी पावसाचा तडाखा

नंदुरबार तालुक्यातील गंगापूर परिसरात गारपिटीसह तुफान अवकाळी पाऊस बरसला. गंगापूरला तब्बल अर्धा तास पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी लागवड केलेला कांदा अवकाळीने नष्ट झाला. या अवकाळी पावसामुळे कांदा आणि मका पिकांच्या सर्वाधिक नुकसान झालं. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड दिसली. तर काही घरांचे पत्रे उडाले.

Maharashtra Rain update
Beed Teachers strike : आठ दिवसांपासून उपोषण, साधा फोन नाही, जीवाचं बरं वाईट झाल्यास...; शिक्षकांचा सरकारला इशारा

अन् अचानक झाडाने पेट घेतला

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास जोरदार वादळी वारा, विजांचा कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. बागलाणमधील नवे निरपूर येथील शेतकरी राकेश सूर्यवंशी यांच्या राहत्या घरासमोर असलेल्या नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने झाडाने पेट घेतला. वीज कोसळताना सुदैवाने घरातील सर्व जण बाजूला असल्याने कुठलीही हानी पोहोचली नाही.

Maharashtra Rain update
Kalyan dombivli House Price : सर्वसामान्यांना झटका; कल्याण-डोंबिवलीत घरांच्या किमती अडीच लाखांनी महागणार

अवकाळीने बळीराजाला रडवलं

अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. नगरच्या संगमनेर आणि अकोले तालुक्याला पावसाने झोडपले. जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान झालं आहे. काढणीस आलेला गहू भुईसपाट झाला. इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. संगमनेर तालुक्यातील पठारभाग आणि अकोले तालुक्यातील राजूर परिसरात जोरदार पावसाची हजेरी लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com