Navi Mumbai : ५ मजली अनधिकृत इमारत, ९० छोटे फ्लॅट; सिडकोने थेट जेसीबी फिरवला, शेकडो बेघर

Navi Mumbai News : नवी मुंबईत सिडकोच्या प्लॉटवर ५ मजली अनधिकृत इमारत बांधण्यात आली. सिडकोने या बांधकामावर थेट जेसीबी फिरवला आहे.
Navi Mumbai
Navi Mumbai NewsSaam tv
Published On

नवी मंबई : खारघरमधील सिडकोच्या राखीव प्लॉटवर बेकायदेशीर इमारत उभारण्यात आल्याची बाब समोर आली आहे. खारघर सेक्टर 5 मधील राखीव भूखंडावर तब्बल ५ मजली इमारत बांधण्यात आली आहे. या अनधिकृत इमारतीवर सिडकोने तोडक कारवाई केली आहे. सिडकोच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे.

Navi Mumbai
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कोकणानंतर मराठवाड्यातील बड्या नेत्याने साथ सोडली

बांधकाम व्यावसायिकाने सिडकोच्या भूखंडावर पाच मजली अनधिकृत इमारत उभारली होती. पाच मजली अनधिकृत इमारतीमध्ये तब्बल 90 छोटे फ्लॅट तयार करण्यात आले होते. जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने तोडक कारवाई केली. सिडकोच्या कारवाईने इमारतीत भाडेत्त्वाने राहणारे नागरिक बेघर झाले आहेत. सिडकोच्या भूखंडावर अनधिकृत इमारत उभारणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Navi Mumbai
Pune Crime : पुणे हादरलं! अनैतिक संबंधात अडसर; बायकोने डाव रचला अन् नवरा पलंगावर झोपलेला असतानाच...

सातपीर दर्ग्याला महापालिकेची नोटीस

नाशिकच्या काठे गल्ली सिग्नल परिसरात असलेल्या सातपीर दर्ग्याला नाशिक महापालिकेने नोटीस धाडली आहे. १५ दिवसात स्वतःहून अतिक्रमण काढा अन्यथा महापालिका करणार कारवाई, अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली आहे. धार्मिक स्थळ अनधिकृत असल्याचं महापालिकेने नोटीसमध्ये म्हटलं आहे.

Navi Mumbai
Beed Teachers strike : आठ दिवसांपासून उपोषण, साधा फोन नाही, जीवाचं बरं वाईट झाल्यास...; शिक्षकांचा सरकारला इशारा

सातपीर दर्गा अनधिकृत आणि सरकारी जागेवर असल्यानं तो स्वतःहून १५ दिवसांत काढून घेण्याची नोटीस बजावली आहे. काही दिवसांपूर्वी याच दर्गेवरील वादग्रस्त अतिक्रमण महापालिकेने पोलिस बंदोबस्तात काढले होते. त्यानंतर दर्ग्याच्या विश्वस्तांनी वक्फ बोर्डात धाव घेतली होती. महापालिकेने नोटीस दिल्यानंतर सातपीर दर्ग्याचे विश्वस्त काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com