Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कोकणानंतर मराठवाड्यातील बड्या नेत्याने साथ सोडली

Uddhav thackeray news : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. मराठवाड्यातील बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली आहे.
Uddhav thackeray Latest News
Uddhav thackeray NewsSaam tv
Published On

आगामी महापालिका निवडणुकीआधी मराठवाड्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांच्यानंतर आता मराठवाड्यातील नेत्याने उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी ठाकरे गटात प्रवेश करून संजय शिरसाठ यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या राजू शिंदे यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे.

Uddhav thackeray Latest News
Narendra Modi : नरेंद्र मोदींचा वारसदार कोण? महाराष्ट्रातील दोन नावांची जोरदार चर्चा, पाहा स्पेशल रिपोर्ट

राजू शिंदे हे ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करत नवी राजकीय सुरुवात करण्याची शक्यता आहे. राजू शिंदे हे कोणत्या पक्षात जाणार, हे स्पष्ट झालेलं नाही. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी दर्शवत राजू शिंदे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजू शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे मराठवाड्यात ठाकरेंना धक्का बसला आहे.

Uddhav thackeray Latest News
Kalyan News: 'एप्रिल फूल'वरून राजकारण रंगलं; शिंदे गट आणि मनसेत सोशल मीडियावर 'पोस्ट वॉर', कोण काय म्हणालं?

राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राजीनामा कळवला. राजू शिंदे यांनी पत्रात म्हटलं की, 'मी आणि माझे सहकारी शिवसेना पक्षाचा राजीनामा देत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्यावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला होता. माझ्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली. मी काही कारणात्सव आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल माझी नाराजी आहे. त्यामुळे माझे सर्व समर्थक,सहकारी यांच्यासह शिवसेना पक्ष आणि विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा देण्याचं ठरवलं आहे'.

Uddhav thackeray Latest News
Shocking : धक्कादायक! भाजप महिला नेत्याचा बॉयफ्रेंडसोबत गार्डनमध्ये रोमान्स; लोकांनी रंगेहात पकडून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

विधानसभा निवडणुकीत १ लाखांवर मतं

राजू शिंदे यांनी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात २०२४ साली निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत संजय शिरसाठ यांनी १६,३५१ मतांनी त्यांचा पराभव केला होता. राजू शिंदे यांना १ लाख ६ हजार १४७ मते पडली होती. तर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांना १ लाख २२ हजार ४९८ मते मिळाली होती. त्यामुळे राजू शिंदे यांना मराठवाड्यातील महत्वाचा नेता म्हणून पाहिले जात होते. मात्र, त्यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून साथ सोडली आहे. शिंदे यांनी पुढील वाटचालीविषयी अद्याप जाहीर केलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com