
रमजाननिमित्त भाजपने सौगात-ए-मोदी उपक्रम सुरू केलाय. मोदी सरकारच्या या उपक्रमावरून उद्धव ठाकरेंनी भाजपची फिरकी घेतली. 'बंटेंगे तो कटेंगे' म्हणणारे आता सौगात-ए- सत्तेसाठी उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमातून भाजपची दुटप्पी भुमिका समोर आलीय असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केलीय.
यामुळे भाजपचा हा उपक्रम सौगात-ए-मोदी नाही तर सौगात-ए- सत्ता असल्याचं आरोपही ठाकरेंनी केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने राज्यात 'बंटेंगे तो कटेंगे' चा नारा दिला होता. पण आता तेच लोक सौगत-ए- मोदी कीट्सचे वाटप करत आहेत. त्यावरून भाजपचा दुटप्पी चेहरा समोर येत आहे. भाजपचा हा उपक्रम गरीब लोकांना मदत करण्याचा नाही, तर राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय.
येत्या काही दिवसात बिहार राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. बिहारमध्ये सत्ता मिळावे यासाठी भाजपने हा उपक्रम सुरू केलाय. मी हिंदुत्त्व सोडून दिल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय. पण आता ते काय करत आहेत, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. कुणाल कामराबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, गद्दारांचा अपमान केल्यामुळे सरकार कुणाल कामाराला समन्स देत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकरांविरोधात काहीच कारवाई केली नाहीये.
राज्यातील शेतकरी प्रश्न, नागपुरातील दंगल आदी घटनांवरून आणि मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरुच आहेत. नागपुरात दंगल झाली. बरीच वर्षे शांत असलेल्या नागपुरात दंगल घडली. मुख्यमंत्री सगळ्यांना सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ज्यांच्या मनात अजूनही मुख्यमंत्रिपदाचे कोंब नको तिथे फुटलेत, ते कोंब जात नाहीत. त्यामुळे छळतात की काय, हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना पडला असेल, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. शिवसेना पक्ष मालक आणि गुलाम लोकांचा नाहीये. तर बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे. शिंदेगटात आलेल्या कार्यकर्त्यांबाबत शिंदे म्हणाले, हे शिवसैनिक सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मायला आले नाहीत.
शिवसैनिक कठोर मेहनत करत जनतेला चांगले दिवस आणत आहेत. आम्ही सर्वजण जमिनीशी नाळ बांधलेले कार्यकर्ते आहोत. शिवसेना पक्ष हा कार्यकर्तांचा आहे, मालक आणि नोकरांचा पक्ष नाहीये. आमच्यावर होणाऱ्या टीकेचं उत्तर आम्ही आमच्या कामातून दिलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.